श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ सध्या मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाला 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाचे माजी फलंदाज राहुल द्रविड दौऱ्यावर गेले आहेत. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावे केली. याच दरम्यान श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांची पत्नी माधी मालार यांचा शुक्रवारी (23 जुलै) वाढदिवस होता आणि द्रविड यांनी त्यांना वाढदिवसाचा खास मेसेज पाठविला आहे.
खरं तर मुरलीधरन यांच्या पत्नीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत होते. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणाले होते की, ‘नमस्कार माधी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशा आहे की, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल आणि पुढे येणारे अनेक वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असतील. आशा आहे की, मुरली तुमच्याकडे लक्ष देत आणि तुमची काळजी घेत असतील.’
https://www.instagram.com/p/CRrQZCsBqwv/?utm_source=ig_web_copy_link
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर चांगली कामगिरी करत आहे. यामुळे अनेक दिग्गज आता राहुल द्रविड यांनाच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक करण्याची मागणी करत आहेत. युवा खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्यातील गुण ओळखणारे राहुल द्रविड महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी तिसर्या एकदिवसीय सामन्यात पाच भारतीय युवा खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. (Coach Rahul Dravid wished Muralitharan a happy birthday, he said)
शुक्रवारी (23 जुलै) रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिका संपल्या आहेत. आता भारत आणि श्रीलंका मध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 25 जुलै रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा
-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”