भारतीय संघाचे माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखालील युवा टीम इंडिया झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी रवाना झाली आहे. या दाैऱ्यामध्ये भारतीय संघ 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 6 जुलै रोजी भारतीय संघ पहिला सामना खेळेल. बीसीसीआयकडून या दाैऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आले आहे. अभिषेक शर्मा, रियान पराग सारखे स्फोटक फलंदाज, ज्यांनी आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. ते भारतीय संघात पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. या दौऱ्यात शुबमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी युवा टीम इंडिया उडाण भरली आहे. बीसीसीआय सोशल मीडियावर टीम इंडियाचे फोटे शेअर करत ही माहिती दिली आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आता भारताचा दबदबा कायम ठेवण्याची जबाबदारी युवा खेळाडूंवर आहे. टी20 विश्वचषक संघाचा भाग असलेले यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन लवकरच संघात सामील होणार आहेत. मात्र, सध्या हे खेळाडू बार्बाडोसमध्ये संघासोबत अडकले आहेत. बेरील वादळामुळे भारतीय संघाचे त्यांच्या देशात परतण्यास विलंब होत आहे.
Jet ✈️
Set 👌
Zimbabwe 🇿🇼#TeamIndia 🇮🇳 | #ZIMvIND pic.twitter.com/q3sFz639z7— BCCI (@BCCI) July 1, 2024
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएल स्टार अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल, रियान पराग आणि तुषार देशपांडे यांचा प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंचे पदार्पणही जवळपास निश्चित झाले आहे. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी, ज्याचा यापूर्वी संघात समावेश करण्यात आला होता. दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. त्यांच्या जागी शिवम दुबेचा समावेश करण्यात आला.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी20 आंतरराष्ट्रीय वेळापत्रक
पहिला टी20 – शनिवार, 6 जुलै
दुसरा टी20 – रविवार, 7 जुलै
तिसरा टी20 – बुधवार, 10 जुलै
चौथा टी20 – शनिवार, 13 जुलै
पाचवा टी20 – रविवार, 14 जुलै
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील कुमार अहमद, मुकेश , तुषार देशपांडे
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मानंतर टी20 मध्ये भारताचा कर्णधार कोण होणार? जय शाह यांचं मोठं वक्तव्य
चक्रीवादळाचं संकट आणखी गडद, टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकली; भारतात कधी परतणार?
“फायनलमधील विराट कोहलीच्या खेळीनं भारताला अडचणीत आणलं होतं”, संजय मांजरेकर पुन्हा बरळले