भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रोहित याला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगात कार चालवल्याबद्दल तीन ट्रॅफिक चालान देण्यात आल्याची माहिती मिळतेय. गुरुवारी (19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी रोहित पुण्यात भारतीय संघात सामील होण्यासाठी जात असताना ही घटना घडली.
एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, रोहित भारतीय संघात सामील होण्यासाठी पुण्याकडे येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गने लॅम्बोर्गिनी या सुपर कारने येत होता. रोहित स्वतः ही गाडी चालवत असताना गाडीचा वेग हा प्रति तास 200 पेक्षाही जास्त होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई केल्याचे समजते.
रोहित शर्मा याच्याकडे लॅम्बोर्गिनी उरूस ही सुपर कार आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी असलेला 264 हाच या गाडीचा क्रमांक आहे. रोहितवर ही कारवाई झाल्यानंतर अनेकांनी त्याला जपून कार चालवण्याचा सल्ला दिला असून, भारतीय संघासह प्रवास करावा असे देखील सुचवले.
या विश्वचषकातील आतापर्यंत भारतीय संघाच्या कामगिरीचा विचार केल्यास भारताने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. स्वतः रोहित एक शतक व एक अर्धशतकासह भारतीय संघाच्या फलंदाजीचे नेतृत्व करतोय.
(Indian Cricket Team captain Rohit Sharma reportedly received three traffic challans for speeding on the Mumbai-Pune Expressway)
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण