आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रीलंकेकडे रवाना झाला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेचे 4 सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे. बुधवारपासून (30 ऑगस्ट) स्पर्धेला सुरवात होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अजूनही एनसीएमध्ये सराव करत आहे. भारतीय संघाने श्रीलंकेसाठी भरारी घेतलेला फोटो तिलक वर्माने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विलक वर्मा (Tilak Varma) याने त्याच्या इंस्टाग्रामवर विमानातील फोटो शेअर केला आहे. तिलकसोबत कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादवही दिसत आहेत. तिलकने या पोस्ट खाली कॅप्शनमध्ये श्रीलंका असे लिहिले आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे. तिलकच्या या फोटोला अवघ्या तासाभरात हजारो लोकांनी लाईक केले. त्याचवेळी रवींद्र जडेजा याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला फोटो शेअर केला आहे.
भारतीय संघाने आशिया चषकासाठी तिलकला संघाच्या 17 सद्स्यांमध्ये स्थान दिले आहे. युवा फलंदाजाने वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण वेस्ट इंडिजविरुद्ध केले. याआधी त्याने देशांतर्गत सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिलकने इंडियन प्रीमियर लीगमध्येही अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. याच कारणामुळे तो भारतीय संघात प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिलकला स्थान मिळू शकते. तिलक हा भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर सिद्ध होऊ शकतात.
https://www.instagram.com/p/CwjsND6IN-e/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान पाकिस्तान पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळणारा आहे. यांनतर भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघ अशिया चषकाचे प्रवळ दोवेदार माणले जात आहेत. भारत आणि पाकिस्तान संघात आपल्याला अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. या दोन्ही संघानी युवा खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. भारतीय संघाच्या चौथ्या क्रमाच्या प्रश्नावर आता श्रेयस अय्यर हे उत्तर मिळाले आहे. यामुळे भारतीय संघ आता मजबूत झालेला दिसत आहे. (indian cricket team depart to sri lanka tilak varma and ravindra jadeja share his photo on instagram)
महत्वाच्या बातम्या-
दिग्गज खेळाडू आशिया चषकापूर्वी संघातून पडला बाहेर, सर्वत्र उडाली खळबळ
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानविरुद्ध विराटसाठी चालून आली मोठी संधी, लगेच वाचा