---Advertisement---

नव्या जर्सीत फोटोशूट करताना टीम इंडियाने केली धमाल, व्हिडिओ पाहाच

On: शनिवार, जून 17, 2023 9:20 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नव्या जर्सीमध्ये दिसला. आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या आदिदास या कंपनीने भारतीय संघाची नवीन जर्सी डिझाईन केली आहे. आदिदासने तिन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी वेगवेगळ्या जर्सी डिझाईन केल्या आहेत. या जर्सी परिधान केल्यानंतर झालेल्या अशोक चा व्हिडिओ नुकताच आदिदासने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. यामध्ये भारतीय खेळाडू मजामस्ती करताना दिसून आले.

https://www.instagram.com/reel/CtjkHknOKWa/?igshid=MWQ1ZGUxMzBkMA==

 

अदिदास इंडियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे सर्व प्रमुख खेळाडू दिसून येत आहेत. यासोबत महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पुरुष संघातील कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह हे या फोटोशूटमध्ये दिसून आले.

अदिदासने लॉन्च केलेल्या या जर्सीमध्ये भारतीय संघाची कसोटी जर्सी पांढऱ्या रंगाची असून, त्यामध्ये खांद्यावर तीन निळ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या दिसून येतात. भारतीय वनडे संघाची जर्सी हलक्या निळ्या रंगाची असून त्यावरही तीन आडव्या पट्ट्या दिसून येतात. तर छातीवर एक वेगळी डिझाईन दिसून येते. टी20 संघाची जर्सी बिना कॉलरची असून, त्यामध्ये अशोक चक्रातील आऱ्यांप्रमाणे छातीवर डिझाईन दिसून येते. या तिन्ही जर्सीवर छातीवर इंडिया अशी अक्षरे लिहिली आहेत.

अनेक वर्ष भारतीय संघाला नाइकी ही अग्रगण्य किट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्पॉन्सर करत होती. त्यानंतर 2020 मध्ये एमपीएल स्पोर्ट्सने त्यांची जागा घेतली. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला एमपीएलने आपला करार मागे घेतला होता. त्याच्या जागी किलर जीन्सने काही काळ भारतीय संघाला स्पॉन्सर केले. यानंतर अदिदासने 2028 पर्यंत नवा करार केला आहे.

(Indian Cricket Team Photoshoot For New Jersey Virat Rohit Bumrah Have Fun)

महत्वाच्या बातम्या –
“तुम्ही एका रात्रीत सगळे बदलू शकत नाही”, टीम इंडियाच्या समर्थनात उतरला दिग्गज
VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---