साउथँम्पटन। आयसीसीच्या 12 व्या विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या या विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटनला होणार आहे. त्यामुळे या सामन्याआधी भारताकडे तयारीसाठी बराच वेळ असल्याने भारतीय संघ नवनवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय संघाने नुकतेच एक टीम बॉन्डींगचा उपक्रम केला आहे. या उपक्रमात भारतीय संघाने जंगलात जाऊन पेंटबॉल खेळण्याची मजा घेतली आहे. यावेळी भारतीय संघाबरोबर सपोर्ट स्टाफमधील सदस्यही उपस्थित होते.
या उपक्रमादरम्यानचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच खेळाडूंनीही हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिसते की विश्वचषकासाठी भारतीय संघात असलेले जवळ जवळ सर्व 15 खेळाडू तसेच राखीव खेळाडूंमध्ये असलेला दिपक चहरही या मजेशीर उपक्रमात सहभागी झाला होता.
तसेच या फोटोंमध्ये दिसते खेळाडूंनी आर्मीची कपडे घालून पेंटबॉल खेळण्यची मजा घेतली आहे.
A fun session of paintball with the boys #TeamActivity #Wilderness pic.twitter.com/ckeYz8TROR
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) May 31, 2019
Snapshots from #TeamIndia's fun day out in the woods. Stay tuned for more….. pic.twitter.com/nKWS21LXco
— BCCI (@BCCI) May 31, 2019
Fun times with the boys ???????????? pic.twitter.com/f3vAuYiRWQ
— Virat Kohli (@imVkohli) May 31, 2019
Fun and play in the woods today with #TeamIndia ???????? pic.twitter.com/YbRSsBX8FP
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) May 31, 2019
Player DenKnown's British Grounds! #Thala #Cherry #WhistlePodu #CWC19 ???????? pic.twitter.com/qbMmAGkocn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 31, 2019
याआधीही बीसीसीआयने भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये विराटच्या गोलंदाजी सरावाचा तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी भारतीय संघाकडून वेगवेगळ्या प्रकारे करुन घेतलेल्या सरावाचा व्हिडिओचाही समावेश आहे.
भारतीय संघाने या विश्वचषकाआधी दोन सराव सामने खेळले आहेत. यातील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तर बांगलादेश विरुद्ध भारताने विजय मिळवला आहे. आता भारतीय संघ या विश्वचषकाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
What's happening in @coach_rsridhar's new fielding drill? Find out here ???????? #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/y3Ffc60PVW
— BCCI (@BCCI) May 30, 2019
A little warm-up before hitting the nets for #TeamIndia Skipper @imVkohli.#CWC19 pic.twitter.com/OlwbKq0czD
— BCCI (@BCCI) May 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तान विरुद्ध यष्टीरक्षक शाय होपने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचा असा आहे इतिहास
–विश्वचषक २०१९: विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेले ५ विक्रम




