अलीकडेच टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकला. यानंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. पण आता टीम इंडियाला यावर्षी किती सामने खेळायचे आहेत? भारत यंदा कोणत्या देशांविरुद्ध खेळणार? आता भारतीय संघाला बांग्लादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अशा प्रकारे भारत आणि बांग्लादेशचे संघ 5 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील.
बांग्लादेश मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 5 कसोटी खेळणार आहेत. त्याचबरोबर यानंतर टीम इंडियासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-इंग्लंड मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
यावर्षी भारतीय संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये 18 सामने खेळायचे आहेत. त्याचवेळी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिली कसोटी 16 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 टी-20 सामन्यांची मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर शेवटचा टी-20 सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे.
हेही वाचा-
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ