---Advertisement---

ओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 6:04 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील ३ सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ओव्हलच्या मैदानात सुरू झाला आहे. या दरम्यान भारतीय संघाने एक अशी कृती केली, ज्यामुळे सगळीकडून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे.

नुकतेच भारतातील महान क्रिकेट प्रशिक्षक आणि ‘भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य’ म्हणून नावारूपाला आलेले, वासुदेव परांजपे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यामुळे भारतीय क्रिकेट जगतात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भारतातील सर्व आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी परांजपे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते.

त्यामुळे आता भारतीय संघाने देखील चौथ्या कसोटी सामन्यात परांजपे यांना आदरांजली म्हणून सामन्यादरम्यान आपल्या डाव्या हाताला काळ्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या आहेत. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत एक फोटो शेअर केला आहे. यावर परांजपे यांचे पुत्र जतीन परांजपे यांनी भारतीय संघाच्या या कृतीवर आभार व्यक्त केले.

अशी होती वासू परांजपे यांची भारतीय क्रिकेटमधील कारकीर्द
परांजपे हे भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारताचे दिग्गज सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांच्याबरोबरच आजच्या पिढीतील रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना मार्गदर्शन देण्याचे काम केले होते. परांजपे यांनी २९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी २ शतकं आणि २ अर्धशतकं देखील केले होते. तसेच ८० च्या दशकात परांजपे बीसीसीआयचे प्रशिक्षणाचे मुख्य अधिकार देखील राहिले होते.

परांजपे गेल्या अनेक काळापासून पार्किन्सन नावाच्या एका आजाराने ग्रस्त होते. ज्यामुळे त्यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी माटुंगा येथील राहत्या घरात दुःखद निधन झाले. परांजपे यांचे भारतातील अनेक खेळाडूंसोबत भावनिक संबंध जोडले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक क्रिकेटपटूंनी यावर मोठा शोक व्यक्त केला होता.

दरम्यान, तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघात मोठ्या बदलांचे संकेत दिले होते. त्यामुळे सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात संधी न मिळालेल्या आर अश्विनला चौथ्या कसोटी सामन्यात संघात संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यातही अश्विनला संधी मिळाली नाही. यामुळे अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर कोहलीने इंग्लंडमध्ये ४ डावखुरे फलंदाज असल्यामुळे रवींद्र जडेजा यासाठी उपयुक्त असल्याचे कारण सांगितले.

चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २ बदल केले आहेत. मोहम्मद शमी ऐवजी संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. तर ईशांत शर्मा ऐवजी उमेश यादवला संघात संधी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या –
विराट जिथे, विक्रम तिथे! कोहलीचा ओव्हल कसोटीदरम्यान मोठा विश्वविक्रम; सचिन, पाँटिगही पडले मागे
“पत्रकार परिषद संपवून आला अन् निवृत्तीची घोषणा केली”, शास्त्रींनी सांगितला धोनीच्या कसोटी निवृत्तीचा किस्सा
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर दिल्या अश्या प्रतिक्रीया

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---