भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात तिसर्या कसोटी सामन्याने करणारा आहे. हा सामना सिडनीत 7 जानेवारीला सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघ नवीन वर्षाच्या मोक्याच्या क्षणी मेलबर्न येथे आहे. भारतीय संघ तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी तीन दिवस अगोदर सिडनीत जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये केएल राहुल, आर अश्विन आणि अजून बर्याच खेळाडूंचा समावेश आहे. तसेच बीसीसीआयने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर शिखर धवनने पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय खेळाडूंनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
केएल राहुलने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामधे भारतीय संघातील मयंक अगरवाल, जसप्रीत बुमराह आणि भारतीय संघाच्या सहायक स्टाफमधील सदस्य दिसत आहेत. त्याने ट्विट करताना लिहिले आहे,” नवीन वर्ष, नवीन संधी, तिच स्वप्ने आणि नवीन सुरवात” सोबत 2021 लिहून तीन फोटो शेअर केले आहेत.
New year,
New feels,
New chances.
Same dreams,
Fresh starts.2021🙏 pic.twitter.com/PjllURxf5g
— K L Rahul (@klrahul) December 31, 2020
त्याचबरोबर भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन याने ट्विटर वरुन शुभेच्छा देताना चार फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एक फोटो दिल्ली कॅपिटल संघाच्या जर्सीतील आहे. दुसर्या मध्ये मुलासोबत, घोड्यावर बसलेला आणि भारतीय संघासोबतचा आहे. त्याचबरोबर त्याने लिहले, “2020 ने आम्हाला आत्मपरीक्षण करणे, सन्मान आणि आभारी होण्याची संधी दिली. या सर्व संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. ज्याबरोबर मला प्रियजनासोबत वेळ घालवता आला.”
2020 gave us the opportunity to introspect, respect and be thankful. I'm thankful for the chance I received to spend time with my loved ones whilst also being able to go out there and play the sport that I love. Over to you, 2021 😊 pic.twitter.com/vY0FF8eGJC
— Shikhar Dhawan (@SDhawan25) December 31, 2020
त्याचबरोबर भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फिरकीपटू अश्विन याने नवीन वर्षाच्या ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy new year to everyone!! 🥳🥳#NewYear2021
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 1, 2021
बीसीसीआयने सुद्धा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
The BCCI wishes you all a very happy and prosperous New Year 2021.#HappyNewYear2021 pic.twitter.com/0wZIuiWA3i
— BCCI (@BCCI) December 31, 2020
त्याचबरोबर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
डोंबिवली- बोरीवलीकडे टीम इंडियाची धुरा, मुंबईकर रहाणे कर्णधार तर रोहित उपकर्णधार
जेव्हा ब्रायन लाराला स्लेजिंग करणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात, वाचा खुद्द पॉंटिंगने सांगितलेला किस्सा
व्हिडिओ: सराव सामन्यात दिसली आक्रमक श्रीसंतची झलक! तिखट मारा करत फलंदाजांना केले स्लेजिंग