भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि आयपीएल फ्रंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याने सोमवारी (११ ऑगस्ट) सोशल मीडियावर फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
राहुलने हा व्हिडिओ शेअर करताना किंग्ज इलेव्हन पंजाबला टॅग केले आहे. आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या कानांसाठी संगीत.”
राहुल (KL Rahul) हा किंग्ज इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) नेतृत्व करणारा भारताचा पाचवा आणि जगातील १२ वा खेळाडू बनला आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होणार आहे, तर आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.
https://www.instagram.com/p/CDtRcjtgsM8/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलच्या सर्व सामन्यांचे आयोजन यूएईतील दुबई, आबू धाबी आणि शारजाहमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दरवर्षी जोरदार फटकेबाजीने एकहाती सामना जिंकून देणारा क्रिकेटर लागला आयपीएल तयारीला
-आयपीएल २०२०साठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली, टेन्शन झाले कमी
-९ वर्षांच्या पॉटींगमुळे बदलला होता क्रिकेटचा अतिशय महत्त्वाचा नियम, आजही…
ट्रेंडिंग लेख-
-…म्हणून अमेरिकेत क्रिकेट कधी रुजलंच नाही, या गोष्टीमुळे झाले क्रिकेटचे नुकसान
-थेट विरोधी संघातील गोलंदाजाला सेहवागने दिली होती ऑफर; बाऊंसर टाकू नको, रात्री पार्टी देतो
-चालू सामन्यात गाण्याचे शब्द आठवत नव्हते म्हणून सेहवागने थेट १२व्या खेळाडूला बोलावलं होतं मैदानात