संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसला परसण्यापासून रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेटपटू आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवत आहेत.
यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) समावेश आहे. पंड्याने मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) एक व्हिडिओ शेअर केला आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी त्याने मुंबई पोलिसांची प्रशंसा केली आहे. तसेच धन्यवादही दिला आहे.
https://twitter.com/hardikpandya7/status/1248238471212195846
या व्हायरसमुळे सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावेळी खेळाडू विश्रांती करत आहेत. तर अनेक क्रिकेटपटू चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले जात आहेत. तसेच काही क्रिकेटपटू आपापल्या परिवाराबरोबर वेळ घालवत आहेत.
पंड्या आयपीएलमधील फ्रंचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या संघाकडून खेळतो. परंतु या व्हायरसमुळे आयपीएल २०२०चा (IPL 2020) १३वा मोसम १५एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते. परंतु ११ मार्चला केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा रद्द केले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भारतात सध्या ६४१२ पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर १९९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच ५०४ लोक या व्हायरसमधून ठीक झाले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराट कोहलीवरुन आता टीम पेन- मायकेल क्लार्कमध्ये खडाजंगी
-क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! पुढील ८ वर्षात आयसीसीच्या होणार तब्बल २८ स्पर्धा
-कार घेऊन भारतीय क्रिकेटपटू थेट बाजारात, पोलीसांनी फाडलं चलन






