आज ६ डिसेंबर, हा दिवस भारतीय संघासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे या पाचही क्रिकेटपटूंनी भारतीय संघासाठी खेळताना महत्त्वाचे योगदान दिले आहे. कोण आहे ते पाच क्रिकेटपटू ते आज या लेखातून पाहूया.
आज वाढदिवस असणारे भारतीय क्रिकेटपटू –
रविंद्र जडेजा:
भारताचा फिरकीपटू जडेजा आज 35व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागच्या वर्षी दुखापतीचा सामना केल्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि सध्या संघाचा नियमित सदस्य आहे. नुकत्याच पार पडेलल्या वनडे विश्वचषकात त्याची भूमिका महत्वाची राहिली. जडेजाने त्याच्या अष्टपैलू खेळाने आणि अफलातून क्षेत्ररक्षणाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे.
त्याने आत्तापर्यंत 67 कसोटी सामने खेळले असून यात 2804 धावा आणि 275 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 197 वनडे सामन्यात 2756 धावा आणि 220 विकेट्स घेतल्या आहेत. तर 64 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 457 धावा आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत.
6017 international runs ????
546 international wickets ????
2013 ICC Champions Trophy-winner ????Here’s wishing #TeamIndia all-rounder & one of the best fielders – @imjadeja a very Happy Birthday ???????? pic.twitter.com/m4lFgBOpOI
— BCCI (@BCCI) December 6, 2023
जसप्रीत बुमराह:
जलदगती गोलंदाज असणारा बुमराहचा हा 30वा वाढदिवस आहे. बुमराहने मागील काही वर्षात भारताचा एक उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. पण मागच्या वर्षी त्याला सतत दुखापतींचा सामना करावा लागला. वनडे विश्वचषक 2023 मधून बुमराहने चांगल्या प्रकारे पुनरागमन केले असून पुन्हा एकदा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताच्या महत्वाचा गोलंदाज बनला आहे.
त्याने आत्तापर्यंत 89 वनडे सामन्यात 128 विकेट्स घेतले आहेत, तर 62 टी20 सामन्यात 74 विकेट्स घेतले आहेत. तसेच कसोटीमध्ये बुमराहने 30 सामन्यात 128 विकेट्स घेतल्या आहेत.
181 international matches ????
351 international wickets ????
One of the three Indian cricketers to pick a Test hat-trick (in Men’s Cricket) ????Here’s wishing @Jaspritbumrah93 – one of the finest modern-day pacers – a very Happy Birthday ???????? pic.twitter.com/VW6gYlns1h
— BCCI (@BCCI) December 6, 2023
आरपी सिंग:
साल 2007 च्या टी20 विश्वचषकात भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा गोलंदाज आरपी सिंग आज त्याचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे.
आरपी सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 14 कसोटी सामन्यात 40 बळी, तर 58 वनडे सामन्यात 69 बळी घेतले आहेत. तसेच त्याने 10 टी20 सामन्यात 15 बळी मिळवले आहेत.
Here’s wishing former #TeamIndia pacer & 2007 World T20-winner – @rpsingh, a very Happy Birthday ???????? pic.twitter.com/AmLc3NLMtX
— BCCI (@BCCI) December 6, 2023
करुण नायर:
भारतीय फलंदाज करूण नायरचा आज 32 वा वाढदिवस आहे. नायरने भारताकडून खेळताना 2016 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्रिशतक केले होते. भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा तो विरेंद्र सेहवाग नंतरचा तो दुसराच खेळाडू आहे.
त्याने आत्तापर्यंत 6 कसोटी सामने आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीमध्ये 374 धावा आणि वनडेत 46 धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यर:
भारताचा प्रतिभाशाली युवा फलंदाज श्रेयस अय्यर आज त्याचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अय्यरने 2017 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.
त्याने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी करत स्वत:ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. तसेच तो आता मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे. वनडे विश्वचषक 2023 मध्ये त्याला मिळालेली संधी श्रेयसने चांगल्या पद्धतीने साधली.
त्याने आत्तापर्यंत 58 वनडे सामने खेळले आहेत. यात 5 शतक आणि 17 अर्धशतकांसह 2331 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 51 सामने खेळले असून यात त्याने 1104 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून, आतापर्यंत खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांत श्रेयसने 1 शतक आणि 5 अर्धशतकासह 666 धावा केल्या आहेत.
A stylish batter & a superb fielder ????
6⃣ International ????s ????Birthday wishes to @ShreyasIyer15 ????????#TeamIndia pic.twitter.com/8brTsFZTv6
— BCCI (@BCCI) December 6, 2023
महत्त्वाच्या बातम्या –
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
“मला अजूनही स्टोक्सच्या खेळीची स्वप्ने पडतात”
लवकरच समजणार विराट-रहाणे-पुजाराचे भवितव्य! बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत