येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघातील तीन खेळाडू आणि ४ सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव लवकरच खेळाडूंना कोरोनाची दुसरी लस दिली जाणार आहे.
एएनआयसोबत चर्चा करताना एका सूत्राने सांगितले की, “खेळाडूंना कोरोनाची दुसरी लस देण्याची योजना आखण्यात आली आहे. या खेळाडूंना बुधवारी (०७ जुलै) आणि शुक्रवारी (०९ जुलै) लस टोचली जाणार आहे.”
इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जास्तीत जास्त खेळाडूंनी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली होती. तसेच २३ जून रोजी पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या मते, खेळाडूंना सुट्टी देणे योग्य आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाची परिस्थिती वाढत असली तरीही सुट्ट्या कमी केल्या गेल्या नाहीत.(Indian cricketers to be administered second dose of vaccine on July 7 and 9)
इंग्लंडमधून थेट युएईला जाणार भारतीय खेळाडू
येणाऱ्या काही महिन्यात भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंना कसोटी मालिका झाल्यानंतर, आयपीएल आणि टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून सुरू होणारी कसोटी मालिका १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर खेळाडू भारतात न येता आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी यूएईला रवाना होणार आहेत. तसेच आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
शुबमन गिलचा वाद अजूनही सुरू
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्यामुळे कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. संघ व्यवस्थपकांनी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना पत्र लिहून गिलऐवजी पृथ्वी शॉ किंवा देवदत्त पडीक्कलला संघात स्थान देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना अजुनपर्यंत निवडकर्त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. अशातच बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह या प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासह आयपीएलमधूनही बाहेर, पाहा कधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर?
Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टनकूल माही
टी२० विश्वचषकापुर्वी अफगानिस्तान संघात मोठा बदल, अव्वल फिरकीपटू राशिद बनला ‘नवा कर्णधार’