शनिवारचा (७ ऑगस्ट) दिवस भारतीयांसाठी आठवणीतला दिवस ठरला. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक मुख्य कारण म्हणजे, ऑलिम्पिक स्पर्धेत बजरंग पूनिया आणि नीरज चोप्रा यांनी पदक मिळवले. दुसरे मुख्य कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
हा सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय प्रेक्षकांना जेव्हा ही माहिती मिळाली की, भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. त्यावेळी या चाहत्यांनी स्टेडियममध्येच जोरदार जल्लोष साजरा केला. याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
नीरज चोप्राने भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. अंतिम सामन्यातील सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नातच त्याने ८७.५८ मीटरचा भाला फेकून पदक निश्चित केले होते. त्याचे विरोधी खेळाडू त्याच्यापेक्षा अधिक अंतर भाला फेकू न शकल्यामुळे नीरज चोप्रा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. ही गोड बातमी मिळताच इंग्लडमध्ये असलेल्या भारतीय चाहत्यांनी गाणं गाऊन त्याचे कौतुक केले. तसेच मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्यांनी “नीरज चोप्रा तू आमचा हिरो आहेस. टोकियो ऑलिम्पिक मधून तू सुवर्ण पदक जिंकून माघारी येत आहेस..” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CSRkBwpqjBs/?utm_medium=copy_link
भारतीय संघ मजबूत स्थितीत
पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी (७ ऑगस्ट) इंग्लिश कर्णधार जो रूटने शतकी खेळी करत इंग्लंड संघाचे आव्हान टिकवून ठेवले. परंतु भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. इंग्लंडचा संपूर्ण डाव ३०३ धावांत आटोपला. या डावात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्यांदा ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला.(Indian fans cheering for Olympics gold winner neeraj Chopra in Nottingham Trent bridge,watch video)
भारतीय संघासमोर विजयासाठी २०९ धावांचे आव्हान
भारतीय संघाला इंग्लंड संघाने विजयासाठी २०९ धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर (७ ऑगस्ट) भारतीय संघाच्या धावा १ गडी बाद ५२ केल्या होत्या. यामध्ये केएल राहुल २६ धावा करत माघारी परतला आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२-१२ धावा करून मैदानावर टिकून आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांचेच लक्ष भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर टिकून असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘गोल्डन डक’ ची जखम अजूनही ताजी, आता कोहली घेणार भारताच्या विजयाची जबाबदारी! दिले संकेत
बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली
धक्कादायक! ‘रनआऊट’मुळे झाला इतका मोठा बाद की खेळाडूच्या वडिलांना हाणामारीत गमवावा लागला जीव