आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाचे वादळ पुन्हा एकदा उठलेले दिसून येतेय. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याच्यावर ९ वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले. त्यानंतर, आणखी एका आंतरराष्ट्रीय इंग्लिश क्रिकेटपटूची चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन व उपकर्णधार जोस बटलर यांच्यावर देखील एका जुन्या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
दोघांनी केले होते असे ट्विट
रॉबिन्सनवर कारवाई झाल्यानंतर भारतीय चाहत्यांनी आता इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि उपकर्णधार व यष्टीरक्षक जोस बटलर जोस बटलर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही खेळाडू भारतीय चाहत्यांच्या इंग्रजी भाषेची चेष्टा करताना दिसलेले. २०१७ मध्ये या दोघांनी ट्विटरवर भारतीयांच्या इंग्रजी भाषेची खिल्ली उडवताना अनेक ट्विट केले होते. या दोघांच्या संभाषणात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमही सहभागी होता. त्यामुळे, आता या दोन खेळाडूंमधील संभाषणाचे काही ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन्ही खेळाडूंनाही निलंबित करावे, अशी चाहत्यांची मागणी आहे.
https://twitter.com/MasterWayne07/status/1401634924025683969?s=19
वर्णद्वेषाचा वाद पेटला
ओली रॉबिन्सनवर कारवाई झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटू लागले आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील ही कारवाई म्हणजे अति झाल्याची प्रतिक्रिया दिली. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन याने याप्रकरणी रॉबिन्सनची पाठराखण केली. ईसीबीने अशाच एका प्रकरणात आणखी एका खेळाडूची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे माजी खेळाडू फारूख इंजिनीयर यांनी आपल्या वेळीदेखील इंग्लंडमध्ये वर्णद्वेषी घटना होत असल्याचा खुलासा केला.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
जेम्स अँडरसननही अडचणीत! ब्रॉडला ‘लेस्बियन’ संबोधलेले ट्विट होतंय व्हायरल






