तब्बल 15 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून दारूण पराभव केला. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. त्याचवेळी काही माजी क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंची पाठराखण देखील करताना दिसतायेत. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने देखील भारतीय संघाला आपला पाठिंबा दिला. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी त्यालाच धारेवर धरले.
भारतीय संघाला उपांत्य फेरीत 10 गड्यांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. 169 धावांचा बचाव करताना भारताचे गोलंदाज एकाही इंग्लिश फलंदाजाला बाद करू शकले नाहीत. या खराब कामगिरीनंतर चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी सचिन तेंडुलकर याने भारतीय संघाची पाठराखण करताना ट्विट करत लिहिले,
A coin has two sides, so does life.
If we celebrate our team’s success like our own then we should be able to take our team's losses too…In life, they both go hand in hand.#INDvsENG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 10, 2022
‘प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अगदी आयुष्याचे देखील तसेच आहे. जसा तुम्ही संघाचा विजय साजरा करतात तेव्हा, पराभवानंतरही आपल्या संघाच्या पाठीशी राहायला हवे. आयुष्यात या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात.’
सचिनच्या ट्विटरनंतर चाहते निराश झाले. त्यांनी थेट सचिनवरच निशाणा साधला. एकाच चाहत्याने लिहिले,
‘संघाचा पराभव मान्य केला जातो. मात्र, आपला संघ एखाद्या सर्वसामान्य संघाप्रमाणे खेळला. आपल्या गोलंदाजांना एकही बळी मिळवता आला नाही. विश्वचषक जिंकण्यासाठी हवी असलेली इच्छाशक्ती दिसलीच नव्हती. दोनच खेळाडू तुम्हाला विश्वचषक जिंकवू शकणार नाहीत.’
Losses are ok sir its a part of game but sir the way our team played today was just ordinary..we were not able to take a single wicket…The intent for that cup was not there…or do bnde kab tak aapko match jitaynge??Our openers failed to score runs in PP in this whole turnmnt🥲
— Vatsal Sharma (@VatsalSharma5) November 10, 2022
अन्य एका चाहत्याने लिहिले,
‘हार एक वेगळी गोष्ट असते आणि शरणागती पत्करणे वेगळी. लढाई न करता पराभूत होने दुःखद आहे.’
भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेकांनी प्रमुख खेळाडूंना आता टी20 संघातून वगळले जावे अशी मागणी केली आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नाही.
(Indian Fans Troll Sachin Tendulkar After Backing Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड मालिका रंगणार, ‘हे’ सात खेळाडू मात्र धरणार मायदेशाची वाट
खरा बाजीगर! तीन वर्षांपूर्वी विलन ठरलेला हेल्स आज इंग्लंडला फायनलमध्ये घेऊन गेला