---Advertisement---

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 5:47 PM
---Advertisement---

रिषभ पंत आणि शुबमन गिल यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्णायक अशा चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने २-१ च्या फरकाने मालिकाही जिंकली. सोबतच तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पटकावली. याऐतिहासिक विजयानंतर चोहोबाजूंनी भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु सोबतच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत पीटरसनने लिहिले की,  “भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद जल्लोषात साजरा करावा. कारण बऱ्याच अडचणींना सामोरे जात तुम्ही हे यश मिळवले आहे. परंतु, खरा संघ तर काही आठवड्यानंतर तुमच्या पुढे येणार आहे, ज्याला तुम्हाला तुमच्याच मायभूमीत पराभूत करून दाखवावे लागणार आहे. सतर्क राहा, २ आठवड्यात खूप जास्त जल्लोष साजरा करण्यापासून सावध राहा.”

यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी पीटरसनवर निशाना साधला आहे. काहींनी पीटरसनचे वक्तव्य ऐकून, ‘ओ भाई.. मारो मुझे.. मारो’, अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. तर मजेशीर फोटो शेअर करत, ‘लगता है किसीने महाराज की बुद्धी हर ली है’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एका रसिकाने, ‘तूम खेल के बारे मे क्या जानते हो’, असा टोमणा पीटरसनला मारला आहे.

https://twitter.com/KP24/status/1351501549013504001?s=20

https://twitter.com/Muz_7Dec2000/status/1351524645359419398?s=20

https://twitter.com/ColFool_/status/1351549224370937857?s=20

इंग्लंड संघ लवकर भारताच्या दौऱ्यावर 

पुढील महिन्यात इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात ५ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. त्यानंतर १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत दोन्ही संघ ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. सर्व टी२० क्रिकेट सामने अहमदाबाद येथे खेळले जातील. तर २३ मार्च ते २८ मार्च दरम्यान पुणे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे

“ब्रिस्बेन कसोटीबाबत असलेला अति आत्मविश्वास नडला”, माजी फलंदाजाने घेतली क्रिकेट ऑस्ट्रेलियाची शाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---