---Advertisement---

मुलगा झाला रे! बुमराह झाला बाप; पत्नी संजनाने दिला मुलाला जन्म

jasprit bumrah
---Advertisement---

आशिया चषक 2023 चालू झाला आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत शनिवारी चालू असताना भारताची फलंदाजी संपताच पाऊस चालू झाला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला. यामुळे पाकिस्तान संघाची फलंदाजी झालीच नाही. भारतीय संघातील गोलंदाजांना गोलंदाजी करण्यची वेळ आली नाही. अनेक दिवसांपासून क्रिकेट विश्वातून बाहेर असलेला बुमराह पाकिस्तान विरुद्ध कशाप्रकारे गोलंदाजी करतो हे पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक होते. परंतु, पावसामुळे सर्वांचीच नाराजी झाली. जसप्रीत बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्यात गैरहजर असणार आहे.

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वडील झाला आहे. त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध क्रीडा निवेदक संजना गणेशन हिने मुलाला जन्म दिला आहे. बुमराह आशिया चषक 2023 मध्ये सहभागी होत आहे. मात्र सोमवारी तो तीन दिवसांसाठी मुंबईला रवाना झाला. बुमराह आपल्या मुलाच्या जन्मासाठीच मुंबईला गेला आहे. तीन दिवसांत तो पुन्हा भारतीय संघात परतेल.

भारताला आशिया चषक 2023 मध्ये 4 सप्टेंबरला नेपाळशी सामना करावा लागणार असून बुमराह या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही.बुमराहने स्वतःचा, संजना आणि मुलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने आपल्या मुलाचे नावही सांगितले.

बुमराह आणि संजनाने त्यांच्या मुलाचे नाव अंगद जसप्रीत बुमराह ठेवले आहे. त्याने फोटो शेअर करताना बुमराहने लिहिले की, “आमचे छोटे कुटुंब थोडे मोठे झाले आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, सकाळी आम्ही आमच्या कुटुंबात आमच्या मुलाचे स्वागत केले. अंगद जसप्रीत बुमराह. आम्ही खूप, खूप आनंदी आहोत.”

दरम्यान भारतीय संघात बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्यात उपस्थीत नसल्यामुळे भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला संघात सामिल करून घेण्याची शक्यता आहे. (indian fast bowler jasprit bumrah became a father)

महत्वाच्या बातम्या- 
‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या 
हेडच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश! मार्शच्या नेतृत्व कारकिर्दीची शानदार सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---