---Advertisement---

‘मोहम्मद सिराज हा रिषभ पंतचा गोलंदाजीमधला अवतार’, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुक

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 12:45 AM
---Advertisement---

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडला नमवत एक ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावर क्रिकेट रसिकांच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या मोहम्मद सिराजवर देखील अनेक दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सिराजने आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व गाजवले होते. तसेच सामन्यादरम्यान सिराजच्या स्वभावातही आक्रमकता दिसून आली. विकेट घेतल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनचा अंदाज देखील चर्चेचा विषय ठरला. काहींना सिराजचा हा आक्रमकपणा पसंतीस पडला नाही. त्याच्या अशा आक्रमक वागण्याने समालोचक दिनेश कार्तिकने देखील टिप्पणी केली होती.

मात्र, भारताचा माजी क्रिकेटर दीप दासगुप्ता याचे सिराजबद्दलचे जरा वेगळे मत आहे. त्याच्यानुसार सिराज हा रिषभ पंतचा गोलंदाजीमधील अवतार आहे. यावर त्याने सिराज हा पंत सारखाच आक्रमक मानसिकतेचा आहे असा तर्क दिला.

याबाबत युट्युबवर बोलताना दास गुप्ता म्हणाला, “मोहम्मद सिराज अद्भुत आहे. सिराजबद्दल मला एक गोष्ट आवडती. ती म्हणजे सिराज हा रिषभ पंत सारखाच आक्रमक मानसिकतेचा आहे. तो गोलंदाजीमधला रिषभ पंतचा अवतार आहे. अशावेळी एखाद्या दिवशी सिराजकडून जास्त धावा जाऊ शकतात. पण जसे मी पंत बाबत बोलतो तसेच याच्या बाबतीतही बोलेन. आपल्या सर्वांना या दोघांवर विश्वास दाखवला पाहिजे.”

याबाबत पुढे बोलताना दासगुप्ता म्हणाला, “सिराज हा आक्रमक मानसिकतेचा आहे आणि हीच त्याची विशेषता आहे. त्यामुळे लोकांना सिराज सारख्या क्रिकेटरांवर विश्वास ठेवणे. गरजेचे आहे. सिराज सारख्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. एखाद्या दिवशी ते जास्त धावा देऊ शकतात. मात्र, अशा वेळी त्यांच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे आहे. कारण आक्रमकता ही त्यांची मानसिकता आहे. ज्यामुळे ते पुन्हा पुनरागमन करण्याची क्षमता ठेवतात. यामुळे सिराजसारख्या खेळाडूंना आपण प्रोत्साहित केले पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या पंढरीत विजयानंतर भारतीय चाहत्यांचा तुफान जल्लोष, पाहा व्हिडिओ
‘ही ६० षटकं इंग्लंडला नरकासारखी वाटली पाहिजेत’, विराटचा ‘तो’ व्हिडिओ घालतोय धूमाकुळ
इंग्लंड संघात अकरा नव्हे, तर दोनच खेळाडू खेळत होते, माजी भारतीय कर्णधाराची यजमानांवर बोचरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---