भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्याशी विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले असल्याच आरोप केला जात आहे. भारतासाठी १७३ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या माजी क्रिकेटपटूने सोशल मीडियावर आपली वेदना शेअर केली. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यानी केली आहे. इरफानने विस्तारा एअरलाइन्सविरोधात ट्विट केले आहे.
Hope you notice and rectify @airvistara pic.twitter.com/IaR0nb74Cb
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 24, 2022
इरफानने ट्विटरवर लिहिले की, “आज मी विस्तारा फ्लाइट युके-२०१ने मुंबईहून दुबईला जात होतो. चेक-इन काउंटरवर, मला खूप वाईट अनुभव आला, विस्तारा अनवधानाने माझी तिकीट श्रेणी डाउनग्रेड करत होती जी एक निश्चित बुकिंग होती. या प्रकरणाच्या निकालासाठी मला दीड तास काउंटरवर थांबावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी, माझा ५ वर्षाचा आणि ८ महिन्यांचा मुलगा यांनाही या गोष्टी भोगाव्या लागल्या आहेत.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘असं लग्न करू शकत नाही!’ केएल राहुल- आथिया शेट्टीच्या नात्यावर सुनिल शेट्टीने नोंदवली हरकत
सुरेश रैनाला सीएसकेकडून अपेक्षा! आयपीएल २०२३पूर्वी मैदानावर करतोय कसून सराव