टोकियो ऑलिंपिकमध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) महिलांच्या भालाफेक स्पर्धेत ग्रूप ए गटाच्या पात्रता फेरीत भारताची अन्नू राणी १४ व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यास अयशस्वी ठरली आहे.
गुरमीत कौरनंतर (सिडनी २०००) ऑलिंपिक्समध्ये भाग घेणारी दुसरी भारतीय भालाफेकपटू अन्नू राणीने पहिल्या थ्रोमध्ये ५०.३५ मीटरचे अंतर निश्चित केले.
यानंतर २८ वर्षीय अन्नूने दुसऱ्या थ्रोमध्ये ५३.१९ आणि तिसऱ्या थ्रोमध्ये ५४.०४ मीटरचे अंतर गाठले. यादरम्यान तिच्या प्रदर्शनात सुधारणा तर पाहायला मिळालीच, पण हे पदकाच्या राऊंडमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसे नव्हते. (Indian Javelin Thrower Annu Rani could not reach the final of javelin throw, finished 14th)
#JavelinThrow – Update
India's Annu Rani finishes her Qualification round with the final and highest throw of 54.04m finishing at 14th spot.#Tokyo2020 #Olympics #Athletics
— SAI Media (@Media_SAI) August 3, 2021
अन्नू राणी ६३.२५ मीटर या आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोपासून खूपच दूर राहिली. हा विक्रम तिने मार्च महिन्यात फेडरेशन कपदरम्यान बनवला होता.
या स्पर्धेत ६३ मीटरच्या पात्रता फेरीत पोलंडच्या मारिया आंद्रेझिकने ६५.२५ मीटर अंतरासह १५ भालाफेकपटूंच्या ग्रूप एमध्ये अव्वल स्थान पटकावले. मारियाला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे.
यानंतर ऑस्ट्रेलियाची मॅकेन्झी लिटल ६२.३७ मीटर अंतरासह दुसऱ्या आणि चीनची ल्यू हुईहुई ५९. २२ मीटरसह तिसऱ्या स्थानी राहिली. ग्रूप बीमध्येही १५ ऍथलिट सामील आहेत. अव्वल १२ ऍथलिट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
याव्यतिरिक्त अन्नू राणीने आपल्या ग्रूपमध्ये १४ वे स्थान पटकावले. त्यानंतर तिच्यासाठी स्पर्धेतील सर्व वाटा बंद झाल्या आहेत.
भारताचा नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंग बुधवारी (४ ऑगस्ट) पुरुषांच्या भालाभेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळताना दिसेल.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव
-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत