टोकियो ऑलिंपिक २०२० च्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी (२४ जुलै) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अ गटातील पहिला हॉकी सामना पार पडला. हरमनप्रीत सिंगच्या शानदार प्रदर्शनामुळे भारताने न्यूझीलंडवर ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. आता त्यांची पुढील लढत रविवारी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Hockey
Men's Hockey Pool A Results✌️ for Victory for the Indian Men's Hockey team against New Zealand, as safe hands @16Sreejesh guarded the goal superbly! #Congratulations boys 👏 #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/7zE2n4EMUC
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
या सामन्यादरम्यान हरमनप्रीत सिंगने भारताकडून सर्वाधिक २ गोल्स केले. तसेच रुपिंदर पाल सिंगच्या एका गोलनेही संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि गोलकिपर पीआर श्रीजेश यानेही बहुमुल्य योगदान दिले. त्याने न्यूझीलंडला मिळालेल्या १० पेनल्टी कॉर्नरवर केवळ एकच गोल नोंदवू दिला आणि संघाचा विजय निश्चित केला.