---Advertisement---

‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट

On: रविवार, जुलै 31, 2022 10:49 AM
KL-Rahul
---Advertisement---

भारतीय संघाचा सालामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून विश्रांतीवर आहे. शनिवारी (३० जुलै) बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. याठिकाणी संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची असून राहुल या मालिकेसाठीही उपस्थित नाहीये. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळणार नसल्यामुळे राहुलच्या फिटनेसविषयी अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण त्याने स्वतः या सर्व प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले आहे. 

सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघात पुनरागमन करणार होता, पण त्यापूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याला संघातून पुन्हा माघार घ्यावी लागली. आगामी झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. केएल राहुल प्रमाणेच नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे महत्वाचे खेळाडूही या दौऱ्यात अनुपस्थित असतील.

झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी होता आले नसल्यामुळे राहुलने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्वतःची भूमिका मांडली आहे. त्याने लिहिले की, “मी माझ्या हेल्थ आणि फिटनेसविषयी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. जून महिन्यात माझी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. त्यानंतर मी सराव सुरू केला आणि अपेक्षा होती की, वेस्ट इंडीज दौऱ्यात मी संघासोबत जोडला जाईल. मी पूर्ण फिट होणारच होतो, पण दुर्दैवाने कोविड-१९ चे संक्रमण झाले. याच कारणास्तव मी आपोआप काही आठवडे मागे पडलो.”

https://twitter.com/klrahul/status/1553422700856520704?s=20&t=-Fq07A77InEINR-byrtJew

राहुलने पुढे असेही स्पष्ट केले की, “लवकर फिट होण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच शक्य तितक्या लवकर निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध राहू इच्छितो. संघाचे प्रतिनिधित्व करण्याला मी एक सन्मान मानतो आणि निळ्या जर्सीमध्ये पुनरागमन करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही.” दरम्यान, आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर राहुलने संघात पुनरागमन करणे खूपच महत्वाचे असणार आहे. विश्वचषक स्पर्धे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी आगामी आशिया चषकासाठी उपलब्ध राहण्याचा राहुलचा प्रयत्न असेल.

https://twitter.com/BCCI/status/1553390840629776384?s=20&t=-Fq07A77InEINR-byrtJew

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारतीय संघ – 
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपर चाहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!

या आठवड्यात टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहिर होणार! पाहा काय आहेत संभावना

डीकेच वर्ल्डकप तिकिट पक्क! निवडकर्ता म्हणतोय, “आता त्याला…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---