---Advertisement---

आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर

On: रविवार, ऑक्टोबर 4, 2020 4:50 PM
---Advertisement---

आज(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मधील १७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. पण यावेळी मुंबईची सुरुवात खास झाली नाही. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. याबरोबरच त्याने एक नकोसा विक्रमही केला आहे.

हैदराबादच्या संदीप शर्माने टाकलेल्या सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर रोहितने षटकार खेचला होता. मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर रोहित यष्टीरक्षक जॉनी बेअस्टोला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधीचे सामन्यातील पहिले ३ चेंडू रोहितने निर्धाव खेळले होते. त्यामुळे रोहित हा आयपीएलच्ये एका डावात षटकार खेचल्यानंतरही ६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होणारा दुसराच भारतीय सलामीवीर आहे.

याआधी असा नकोसा विक्रम चेतेश्वर पुजाराने केला आहे. पुजारा २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सलामीला खेळताना षटकार मारल्यानंतरही वैयक्तिक ६ धावांवर बाद झाला होता. या दोघांव्यतिरिक्त असा नकोसा विक्रम ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस गेल आणि ख्रिस लिन या परदेशी खेळाडूंनी केला आहे. विशेष म्हणजे मॅक्यूलमच्या बाबतीत असे ४ वेळा झाले आहे.

रोहित जरी आज लवकर बाद झाला असला तरी क्विंटॉन डिकॉकने शानदार फलंदाजी करताना ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---