भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा डॉमिनिका कसोटी सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. यासह भारताने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या विजयात दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि यशस्वी जयसवाल यांनी मोलाचे योगदान दिले. अश्विनने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. तसेच, जयसवालने पदार्पणाच्या कसोटीत 171 धावांची शतकी खेळी साकारली. अशात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने अश्विनच्या प्रदर्शनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला ईशांत?
ईशांत शर्मा (Ishant Sharma) याने वेस्ट इंडिज संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांतील वृत्तांनुसार तो म्हणाला की, “कुणीच विचार केला नव्हता की, हा संघ दीड सत्रातच बाद होईल. मात्र, रविचंद्रन अश्विन आणि जड्डूची गुणवत्ताही महत्त्वाची ठरली. जेव्हा ते सपाट खेळपट्टीवर विकेट्स घेतात, तेव्हा या खेळपट्टीवर तर खूपच वळण मिळत होते. त्यांनी आपल्या प्रदर्शनाने दाखवून दिले की, ते जगातील सर्वोत्तम फिरकीपटू आहेत.”
तो म्हणाला की, “यामध्ये कोणतीच शंका नाही की, तो महान फिरकीपटू आहेत. तो जगातील अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आहे. कोणत्याही गोलंदाजासाठी 10 विकेट्स घेणे कठीण असते. तुम्हाला खूप जास्त गोलंदाजी करायची असते. यासाठी खूप मेहनत लागते. मात्र, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.”
विशेष म्हणजे, पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघ पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाला होता. यादरम्यान आर अश्विन (R Ashwin) याने 24.3 षटकात 60 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. यावेळी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही 14 षटकात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी 130 धावांवर नांग्या टाकल्या. यावेळी अश्विनने 21.3 षटकात 71 धावा खर्चून तब्बल 7 विकेट्स घेतल्या. जडेजाने 21 षटकात 38 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. (indian pacer ishant sharma praises spinner ravichandran ashwin for his performance in dominica test)
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा ‘असा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद
विंडीजविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार विराट, 499 सामन्यांमधील परफॉर्मन्स आहे तरी कसा? वाचाच