---Advertisement---

भारताच्या पराभवानंतर खूप गाजला ‘पनौती’चा वाद, आता शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा राजकीय अजेंडा…’

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 4:18 PM
Pacer-Mohammed-Shami
---Advertisement---

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकण्यात अपयशी ठरला. मात्र, संघाचे संपूर्ण स्पर्धेतील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले. भारताने सलग 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती, पण ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरले. असे असले, तरीही भारतीय खेळाडूंनी स्पर्धा गाजवली. त्यात मोहम्मद शमी याच्या नावाचाही समावेश आहे. शमीने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. विश्वचषक हारल्यानंतर अनेकांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पणवती म्हटले. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचाही समावेश होता. आता शमीने मोदींना ‘पनौती’ म्हटल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शमी?
माध्यमांशी बोलताना मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला विचारले गेले की, ‘राहुल गांधींनी विश्वचषकाविषयी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तिथे एक पनौती होते, ज्यामुळे सामना गमावला.’ या प्रश्नाचे उत्तर देताना शमी म्हणाला, “यार, हे वादग्रस्त प्रश्न मला समजत नाहीत. बेसिक गोष्टींवर लक्ष द्या, ज्यावर तुम्ही पूर्ण दोन महिने मेहनत घेतली आहे. हा राजकीय अजेंडा मला समजत नाही.”

खरं तर, स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्येही हजेरी लावली होती. तिथे त्यांनी भारतीय खेळाडूंसोबत संवादही साधला होता. तसेच, मोहम्मद शमी याची गळाभेटही घेतली होती. त्याचा फोटो शमीनेही शेअर केला होता.

याव्यतिरिक्त शमीला विचारले गेले की, ‘कोणत्या कमतरता सुधारल्या जाऊ शकतात, काय वाटतं?’ याचे उत्तर देताना तो म्हणाला, “एकूणच सर्वांनी चांगले प्रदर्शन केले आहे. काण, 11 पैकी 10 सामने जिंकले आहेत. 10 पैकी 10 जिंकले होते, तेव्हा आत्मविश्वासाची कमतरता नव्हती आणि कौशल्यांचीही कमतरता नव्हती. मला वाटते की, एक दिवस खराब असू शकतो, जो कोणत्याही वेळी असू शकतो. माझ्या मते, तो दिवस आमचा नव्हता. अशी कोणतीही गोष्ट नव्हती, जी आमचे मनोबल कमी करेल.”

शमीने गाजवली स्पर्धा
मोहम्मद शमीला या स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. मात्र, शमीने संधी मिळताच पुढील 7 सामन्यात विक्रम चला. त्याने 10.70च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने तब्बल 24 विकेट्स घेतल्या. 57 धावा खर्चून 7 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. (indian pacer mohammed shami s reaction on congress leader rahul gandhi s panauti statement pm narendra modi)

हेही वाचा-
‘आतापर्यंतचा सर्वात खराब बॉलिंग अटॅक…’, पाँटिंगने उडवली ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या पाकिस्तान संघाची खिल्ली
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---