ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील डॉक्यूमेंट्री-सीरिज ‘द टेस्ट’ (The Test) अमेझॉन प्राईमवर नुकतीच रिलीझ झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसने भारतीय संघातून बाहेर असलेले खेळाडूसुद्धा आपल्यापेक्षा दमदार असल्याचे सांगितले आहे.
या डॉक्यूमेंट्रीमध्ये स्टॉयनिस म्हणाला की, भारतीय संघ जगातील सर्वात प्रतिभावान देश आहे.
२०१८मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला होता. याचाही उल्लेख द टेस्ट या डॉक्यूमेंट्री-सीरिजमध्ये आहे.
स्टॉयनिसला भारतात खेळायला खूप आवडते. परंतु नुकत्याच झालेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात (Team India) आला होता. तेव्हा त्याला ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली नव्हती.
त्याला भारतीय संस्कृती (India Culture) आवडते. भारतामध्ये एक ऊर्जा असल्याचे त्याने सांगितले. यामुळे तुमचा उत्साह वाढतो. भारतात अशी ऊर्जा आहे की, येथे आल्यानंतर तुम्हाला खेळू वाटणार नाही, असे कधीच होणार नाही.
ऑस्ट्रेलियासाठी २०१९ची वनडे मालिका अविस्मरणीय होती. २०१८मध्ये केप टाऊन येथे चेंडू छेडछाडीनंतर संघाचा हा पहिलाच विजय होता. ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. सुरुवातीचे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकून मालिकेत २-०ने आघाडी घेतली होती.
यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने उर्वरित तिन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली होती. या मालिकेत स्टॉयनिसने १४० धावा केल्या होत्या.
स्टॉयनिस २०१९च्या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर आहे. तरी त्याने बिग बॅश लीग () २०१९-२०मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. मेलबर्न स्टार्सकडून (Melbourne Stars) खेळताना स्टॉयनिसने सर्वाधिक ७०५ धावा केल्या होत्या.
तसेच १२ जानेवारीला बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्ध (Sydney Sixers) खेळताना स्टॉयनिसने अवघ्या ७९ चेंडूत १४७ धावा केल्या होत्या. यामध्ये ८ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. म्हणजेच त्याने २१ चेंडूत १०० धावांचा आकडा पूर्ण केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-शेन वाॅर्नचा दिलदारपणा समोर, आपल्या कंपनीत दारुऐवजी सॅनिटायजर बनवायला केली सुरुवात
-आयपीएलसाठी तुम्ही एका महान व्यक्तीचा अपमान करताय
-रोहितसह हे ४ खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर बाद