---Advertisement---

स्वदेशी ॲप ‘कू’ची क्रिकेटपटूंनाही भुरळ, अनिल कुंबळेसह अनेकांनी उघडले खाते

On: गुरूवार, मार्च 11, 2021 2:34 PM
---Advertisement---

काही महिन्यांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. त्याअंतर्गत भारताने अनेक पर्यायी ॲप विकसित केले आहेत. तसेच ट्विटरला पर्यायी ॲप म्हणून ‘कू’ ॲपची घोषणा केली होती. या ॲप मध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपले खाते उघडले आहे. तसेच काही, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील या मायक्रोब्लॉगिंग ॲप मध्ये आपली पसंती दर्शवली आहे.

‘ कू’ हे ट्विटरला पर्यायी ॲप म्हणून निर्माण करण्यात आलेले स्वदेशी ॲप आहे. या ॲपला काही महिन्यातच दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. यात अनेक सेलिब्रिटी आणि नेते मंडळींनी देखील आपले खाते उघडले आहे. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे, आयसीसीचे सामनाधिकारी आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि भारतीय यष्टीरक्षक खेळाडू सुषमा वर्मा यांनी देखील या ॲपवर आपले खाते उघडले आहे

सुषमा वर्माने देखील उघडले खाते

भारतीय संघातील महिला यष्टिरक्षक खेळाडू सुषमाने देखील ‘कू’ ॲप वर आपले खाते उघडले आहे. तिने यावर काही फोटोज् शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला गेली होती. तिने लिहले आहे की, “आपल्याकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. मला विश्वास आहे की ही स्पर्धा खूप रंगतदार होणार आहे. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते.”

‘कू’ ॲप ची वाढती लोकप्रियता

हे ॲप लॉन्च होऊन अवघे काही महिनेच झाले आहेत आणि या ॲपने १० लाख डाऊनलोडचा टप्पा पूर्ण केला आहे.सुषमा वर्मा व्यतिरिक्त राज्यवर्धन सिंग राठोडचे सुपुत्र मानवात्या राठोड यांनी देखील या ॲपवर खाते उघडले आहे.

महत्वाच्या बातम्या:

पृथ्वी शॉचा झंझावात सुरूच! उपांत्य सामन्यातही तुफानी शतक ठोकत घातली या विक्रमांना गवसणी

बांग्लादेशविरूद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, विलियम्सनच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---