---Advertisement---

मुंबई टू दक्षिण आफ्रिका!! भारतीय संघातील खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना, फोटो व्हायरल

On: गुरूवार, डिसेंबर 16, 2021 11:33 AM
Team-India
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.  या मालिकांसाठी भारतीय संघातील खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने गुरुवारी (१६ डिसेंबर) मार्गस्थ झाले आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India’s South Africa Tour) रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडू रविवारी मुंबईत (१२ डिसेंबर) एकत्र आले होते. तसेच गुरुवारी (१६ डिसेंबर) पहाटे भारतीय संघातील खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने रवाना झाले आहेत. ज्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह दिसून येत आहे. तसेच चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल आणि अजिंक्य रहाणे देखील या फोटोमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

अजिंक्य राहणेला कसोटी संघाच्या उपकर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उपकर्णधार म्हणून कोणाला संधी दिली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी भारताचा १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ : विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेचे वेळापत्रक 
कसोटी मालिका :
पहिला कसोटी सामना: २६-३० डिसेंबर २०२१ (सेंच्युरियन)
दुसरा कसोटी सामना : ३-७ जानेवारी,२०२२ (जोहान्सबर्ग)
तिसरा कसोटी सामना: ११-१५ जानेवारी,२०२२ (केपटाऊन)

वनडे मालिका :
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)

महत्वाच्या बातम्या :

पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’

कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट

ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---