अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अवघ्या दोन दिवसात संपलेल्या या सामन्यात यजमान भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना दोन्ही डावात अनुक्रमे ११२ आणि ८१ धावांवर सर्वबाद केले. त्या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरलाच नाही, आणि भारताने सहज विजय नोंदवला.
या विजयासह इंग्लंडच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. त्याचवेळी भारताचा मार्ग या विजयाने सुकर झाला. आता शेवटच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे किंवा सामना अनिर्णीत राखणे आवश्यक आहे.
भारताच्या या विजयानंतर त्यांच्यावर सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव झाला. ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी ट्विटरवरून भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कसोटी सामन्याबद्दल आपली मतेही मांडली. माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण ट्विट करत म्हणाला, “टीम इंडियाला या विजयाच्या शुभेच्छा. या विजयामुळे भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीत कायम आहे. अक्षर आणि अश्विनने असामान्य प्रदर्शन केले.”
Congrats to Team India for the two-day win which keeps them in the race for the WTC Final! Axar and Ashwin were exceptional, but the batsmen will eye an improved show in the final Test. #INDvsENG
— VVS Laxman (@VVSLaxman281) February 25, 2021
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले. तो म्हणाला, “मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. आशा आहे की भारतीय संघ मालिका ३-१ अशा फरकाने जिंकेल.”
Congratulations #TeamIndia on going up 2-1 in the Test Series. Let’s make it 3-1 guys!
Good luck. 👍🏻#INDvENG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 25, 2021
भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली देखील या विजयाने आपल्या संघावर खुश झाला. ट्विट करत तो म्हणाला, “एक जबरदस्त सांघिक प्रदर्शन. मैदानावर जबरदस्त कामगिरी केली. संघ सहकाऱ्यांनो, शाब्बास!”
An absolute outstanding team effort. 💯
Brilliant on the field. Way to go boys 🇮🇳👏 pic.twitter.com/No0dXnbGmG— Virat Kohli (@imVkohli) February 25, 2021
याशिवाय, रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शिखर धवन या खेळाडूंनीही अभिनंदनाचे ट्विट केले.
महत्वाच्या बातम्या:
सचिनच्या अखेरच्या वनडेत खेळलेले ११ खेळाडू सध्या करतात तरी काय?
पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रतिभेचा ठसा उमटवणारे सरनदीप सिंग
लॉकडाऊनच्या काळात केली कठोर मेहनत, आता मिळत आहेत फळे! अश्विनने उलगडले ४०० बळींमागील रहस्य