लहानपणीपासून प्रत्येकाचेच स्वप्न असते की, एक दिवस भारतीय संघासाठी (team india) क्रिकेट खेळावे. परंतु हे स्वप्न खूपच कमी लोक पूर्ण करू शकतात. काही खेळाडूंना भारतासाठी खेळण्याची संधी मिळते, पण जास्त काळापर्यंत ते संघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. आयपीएलच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर आयपीएलच्या लिलावात करोडो रुपये कमावले आहेत. आपण या लेखात अशाच काही खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे सध्या भारतीय संघासाठी खेळत नाहीत, परंतु आयपीएलमध्ये ते चांगली कमाई करत आले आहेत.
जयदेव उनादकट (jaydev unadkat)
जयदेव उनादकड सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. उनादकडने भारतीय संघासाठी आतापर्यंत ७ कसोटी आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. सध्या त्याच्या जागी अन्य युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली गेली आहे. भारतीय संघातून बाहेर असला, तरी त्याने क्रिकेटमध्ये खूप पैसे कमावले आहेत. आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्ससाठी त्याने खेळलेल्या ८६ सामन्यांमध्ये ८५ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघातून बाहेर असताना त्याने आयपीएलमध्ये ३६ करोडो रुपयांची कमाई केली आहे.
कर्ण शर्मा (Karn Sharma)
कर्ण शर्मा मागच्या ८ वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. अशात तो भारतीय संघात पुढे कधी पुनरागमन करेल, याचीही शक्यता नाहीय. आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये त्याने खेळलेल्या ६८ सामन्यांमध्ये एकूण ५९ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघातून बाहेर असला, तरी आयपीएलमधून त्याने आतापर्यंत ३५ करोड रुपयांची कमाई केली आहे.
सौरभ तिवारी(Saurabh Tiwari)
सौरभ तिवारी. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सौरभ तिवारी भारतीय संघासाठी आतापर्यंत अवघे तीन एकदिवसीय सामने खेळू शकला आहे. त्यानंतर तो संघातून बाहेरच आहे. परंतु आयपीएलमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले आहे आणि फ्रेंचायझींचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. फ्रेंचायझींकडूनही त्याच्यावर मोठी बोली लावली गेली आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ करोड रुपये कमावले आहेत.
करुण नायर(Karun Nair)
करुण नायरने भारतासाठी ६ कसोटी आणि २ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. विरेंद्र सेहवागने भारतासाठी खेळताना एका डावात तिनशे धावा केल्या होत्या. सेहवागनंतर हा कारनामा करणारा करुण दुसरा खेळाडू आहे. असे असले तरी, सध्या तो भारतीय संघातून बाहेर आहे आणि त्याच्या पुनरागमनाचीही काही शक्यता दिसत नाही. भारतीय संघाचे सध्या तो प्रतिनिधित्व करत नसला, तर आयपीएलमधून आतापर्यंत त्याने २७ करोड रुपये कमावले आहेत.
दरम्यान, आयपीएल २०२२ पूर्व बीसीसीआयने मेगा लिलावाचे आयोजन केले आहे. हा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मेगा लिलाव अधिक रोमांचक बनणार, यात कसलीच शंका नाही. मेगा लिलावानंतरच खऱ्या अर्थाने समजू शकेल की, कोणता खेळडू किती रुपये कमावतो.
महत्वाच्या बातम्या –
नारळ देण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी! रहाणेसह ‘या’ ४ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध खेळवणार नाही बीसीसीआय
भारताच्या ताफ्यात निवड होऊनही कुलदीप बाकावरच, संघ व्यवस्थापनाच्या वागणुकीवर प्रशिक्षक म्हणाले…
आयपीएल लिलावात प्रसिद्ध होणार ‘कृष्णा’! ‘या’ चार संघांची असणार करडी नजर