---Advertisement---

हे जरा नवीनच! बीसीसीआयकडून करोडो कमावणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळतात आयपीएलमध्ये काही लाख

On: सोमवार, ऑक्टोबर 11, 2021 7:10 PM
india in australia
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. बीसीसीआय दरवर्षी खेळाडूंशी करोडो रुपयांचे करार करत असते तसेच जाहिरात, थेट प्रक्षेपण व आयपीएल यांच्या माध्यमातून बीसीसीआयला हजारो करोड रुपये मिळतात. याच कारणाने भारतीय क्रिकेटपटूदेखील विविध मार्गानी मिळणाऱ्या पैशामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. भारतातील अनेक प्रमुख क्रिकेटपटूंना आयपीएलमधून करोडो रुपये मिळत असतात. मात्र, भारतीय संघातील असे काही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलपेक्षा बीसीसीआयकडून अधिक पैसे मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये अनेक बड्या खेळाडूंचा समावेश आहे. आज आपण त्याच क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत.

१) चेतेश्वर पुजारा-
भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्‍वर पुजारा हा २०१४ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याच्यावर यावर्षीच्या लिलावात ५० लाखांची बोली लावली होती. मात्र, याच पुजाराला बीसीसीआय दरवर्षी वार्षिक करारातंर्गत पाच कोटी रुपये देत असते. त्याचा समावेश बीसीसीआयच्या ए ग्रेड खेळाडूंमध्ये आहे.

२) मोहम्मद शमी-
जसप्रीत बुमराहपाठोपाठ भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेला मोहम्मद शमी हादेखील आयपीएलपेक्षा बीसीसीआयकडून अधिक पैसे कमावतो. २०१८ आयपीएल लिलावात पंजाब किंग्सने त्याला ४.८० कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केले होते. त्याचवेळी बीसीसीआय त्याला दरवर्षी वार्षिक करारामुळे ५ कोटी रुपये देत असते.

३) ईशांत शर्मा व वृद्धिमान साहा-
अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये समावेश आहे. संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असून, त्याला सध्याच्या हंगामात केवळ तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याला दिल्लीसाठी खेळण्याचे १.१० कोटी तर, बीसीसीआयकडून ५ कोटींची रक्कम मिळते. यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाबद्दल बोलायचे झाले तर त्याला सनरायझर्स हैदराबादकडून १.२० कोटी आणि बोर्डाकडून ३ कोटी रुपये मिळतात.

४) दीपक चहर व शार्दुल ठाकूर-
सध्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारे अष्टपैलू दीपक चहर व शार्दुल ठाकुर हे देखील आयपीएलपेक्षा बीसीसीआयकडून अधिक पैसे कमावतात. शार्दुलला बीसीसीआय तीन कोटी तर, चेन्नई २.६० कोटी रुपये देते. तर, चहरला आयपीएलमधून ८० लाख व बीसीसीआयकडून १ कोटी रुपये दिले जातात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---