आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याच्या या खेळीने त्याने क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनाही प्रभावित केले आहे. दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले आहे. याबरोबरच नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड न केल्याने काही दिग्गजांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.
सूर्यकुमारने केली उत्कृष्ट फलंदाजी
या सामन्यात सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या.त्याच्या या फलंदाजीमुळेच मुंबईला बेंगलोरने दिलेले 165 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठता आले.
त्याच्या फलंदाजीचे दिग्गजांकडून झाले कौतुक –
सुर्यकुमारचे कौतुक अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी केले आहे. यात टॉम मुडी, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. मुडी यांनी सुर्यकुमारची फलंदाजी पाहाताना मजा आली, असे म्हटले आहे. तर सचिनने सुर्यकुमारची शानदार खेळी, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. मुडी आणि हरभजनने कौतुक करण्याबरोबरच त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहे.
Hard to understand how he’s missed both white ball teams? #AustraliaTour
— Tom Moody (@TomMoodyCricket) October 28, 2020
Suryakumar Yadav what a pleasure to watch. #MIvRCB #SuryakumarYadav #IPL
— Tom Moody (@TomMoodyCricket) October 28, 2020
I wonder if Suryakumar Yadav fancies playing International cricket he might move overseas #CoughNZCough
— Scott Styris (@scottbstyris) October 28, 2020
Surya namaskar 🙏🏻. Stay strong and patient @surya_14kumar #MIvsRCB pic.twitter.com/oJEJhekwpC
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 28, 2020
Great win 💪 @surya_14kumar, you beauty 🙌 @mipaltan 🔥 pic.twitter.com/WMYTE95KGs
— hardik pandya (@hardikpandya7) October 28, 2020
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 28, 2020
Class inn yet again @surya_14kumar hope selectors are watching him play😉.. well played @mipaltan @IPL
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 28, 2020
Important win for @mipaltan.
Fantastic innings by @surya_14kumar.
Calm and composed as ever.— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 28, 2020
Bandey mein hai Dum. Jaldi number aayega no doubt. 3 blockbuster seasons in a row.
Brilliant innings from Suryakumar Yadav and a wonderful win for Mumbai. #MIvsRCB pic.twitter.com/DbvmQPkP9z— Virender Sehwag (@virendersehwag) October 28, 2020
Surya Kumar Yadav should’ve been on the flight to Australia. For the T20i series. #MI
— Aakash Chopra (@cricketaakash) October 28, 2020
What a knock by @surya_14kumar! Don't know what else he can do to wear the national colours! Brilliant knock a treat to watch and hope to see you do the same in the Indian colours soon! #MIvsRCB #IPL
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) October 28, 2020
मुंबईने प्ले ऑफमध्ये मिळवण्याच्या जवळ
या सामन्यात मुंबईने आरसीबीचा पराभव करून महत्वाचे 2 गुण मिळवले. या हंगामात खेळलेल्या 12 सामन्यांमधील मुंबईचा हा 8 वा विजय होता. या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या मुंबई एक पाऊल दूर आहे. गुरुवारी(29 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जर कोलकाताने विजय मिळवला तर मुंबईला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आणखी वाट पाहण्याची गरज भासेल. पण जर चेन्नईने कोलकाताला पराभूत केले तर गुरुवारीच मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाली नाही निवड
भारतीय संघ नोव्हेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, सातत्याने चांगली कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवची या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही.
निवड समितीने सूर्यकुमारला संघात स्थान न दिल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. काही माजी क्रिकेटपटूंनीही निवड समितीच्या निर्णययावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मी आहे ना! विजयानंतर सूर्यकुमार यादवने संघातील खेळाडूंकडे पाहून केला इशारा, पाहा व्हिडीओ
रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट
विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ
ट्रेंडिंग लेख-
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय