इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे बीसीसीआयने तत्काळ बैठक घेत आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु २९ मे रोजी झालेल्या स्पेशल जनरल मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की, आयपीएलचे उर्वरित सामने युएई मध्ये खेळवण्यात येणार आहेत. हे सामने सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.अशातच बीसीसीआय परदेशी खेळाडूंच्या मानधनावर कात्री मारण्याच्या तयारीत आहे.
इनसाईड स्पोर्ट्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, युएईला न जाणाऱ्या खेळाडूंना नियमानुसार पूर्ण मानधन मिळणार नाहीये. तसेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी खेळाडूंना प्रो रोटा बेसच्या आधारे मानधन दिले जाईल. तसेच न खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात कपात करण्यात येणार आहे.
कोणत्या देशातील खेळाडूंना होणार नुकसान?
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना या नियमाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. याचे कारण असे की सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यात व्यस्त असतील. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डचे मॅनेजिंग डायरेक्टर ॲशले जाइल्स यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचे खेळाडू मालिका खेळत नसतील तरी ही त्यांना आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
तसेच या स्पर्धेत कोट्यावधींची बोली लावलेले क्रिकेटपटू देखील युएई मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळताना दिसून येण्याची शक्यता खूप कमी आहे. यात बेन स्टोक्स, झाय रिचर्डसन, काइल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, पॅट कमिंस आणि राशिद खान यांचा समावेश आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे की, कुठल्याही परिस्थितीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणारच आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी खालावली, आयसीयूमध्ये केले दाखल
WTC Final: भारतीय संघाला सतावते आहे पुजाराची चिंता, ही उणीव ठरतेय डोकेदुखी