टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील सातव्या दिवसाला (२९ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्टल गटातील पात्रता फेरीत भारताच्या दोन नेमबाजांचा समावेश आहे. तो म्हणजे मनु भाकर आणि राही सरनोबत यांचा. २५ मीटरच्या पिस्टल गटाच्या पात्रता फेरीत मनुने ५ वा, तर दुसरीकडे राहीने २५ वा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी राही मनुच्या पुढे होती. मनुकडून भारतीयांना आशा कायम आहेत.
मनुने ९७, ९७ आणि ९८ स्कोरसह २९२ गुण मिळवले आहेत. दुसरीकडे राहीचे २८७ गुण आहेत. (Manu Bhaker 5th in 25m pistol precision, Rahi Sarnobat 25th in field of 44)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Shooting
Women's 25m Air Pistol Qualification Precision Results @realmanubhaker looks sets, finishing 5th while @SarnobatRahi is placed 25th. Let's keep cheering on our champion shooters!👏🇮🇳🎯 #AllTheBest #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/679IWP7hZL— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
रॅपिड राऊंड अंतिम सामन्यापूर्वी शुक्रवारी (३० जुलै) खेळला जाणार आहे. एकूण ४४ खेळाडूंपैकी अव्वल ८ खेळाडू अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?