सध्या चीनमधील हॅंगझू येथे एशियन गेम्स स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 23 सप्टेंबर रोजी होईल. तत्पूर्वी भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी चीनमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला असून, भारतीय खेळाडूंना व्हीसा न देण्याच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी ही घोषणा केली.
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय मार्शल आर्ट्स संघातील तीन खेळाडू अरुणाचल प्रदेशचे होते. स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने महिला वुशू संघाच्या तीन खेळाडूंना चीनला जाता आलेले नाही. यापूर्वी या तिन्ही खेळाडूंना आशियाई क्रीडा समितीकडून मान्यता मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्यांना मान्यतापत्रे देण्यात आली नाहीत. मार्शल आर्ट टीम 10 सदस्यांची होती. परंतु त्यातील फक्त 7 सदस्य चीनला गेले आहेत.
Our response to media queries on some Indian sportspersons being denied entry into 19th Asian Games:https://t.co/wtoQA8zaDH pic.twitter.com/cACRspcQkD
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 22, 2023
भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील काही भागावर चीन आपला नेहमी दावा करत असते. त्यामुळे त्यांच्याकडून अशा अनेक घटना वारंवार होतात. यालाच प्रत्युत्तर म्हणून विदेश मंत्रालय व भारतीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला.
(Indian Sports Minister Anurag Thakur Not Going To China For Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
U19 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ देशात भरणार भविष्यातील सिताऱ्यांचा मेळा
भेदक गोलंदाजीपुढे काँगारूंनी टेकले गुडघे! भारतासाठी मोहम्मद शमी एकटाच चमकला