बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 भारतीय संघाने 2-1 अशा आघाडीने नावावर केली. मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. सोमवारी (13 मार्च) उभय संघांतील हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
भारतीय संघाने मागच्या तीन बॉर्डर गावसकर ट्रॉफी (BGT) 2-1 अशा अंतराने जिंकल्या होत्या. यावर्षीही ऑस्ट्रेयन संघाला 2-1 अशा अंतराने पराभूत करत भारताने ही ट्रॉफी नावावर केली. सोमवारी सकाळी भारतीय संघ 88 धावांच्या आघाडीवर होता. अहमदाबाद कसोटी सामन्याचा हा शेवटचा दिवस असून 20 विकेट्सचा खेळ बाकी होती. ऑस्ट्रेलियन संघासाठी टॉड मर्फी आणि ट्रेविस हेड दिवसाच्या सुरुवातील फलंदाजीसाठी आले. मर्फी 6 धावा करून तंबूत परतला. पण हेडने 90 धावांची मोठी खेळी करू शकला. मार्नस लाबुशेन 63, तर कर्णधार स्टीव स्मिथ 10 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिले.
The fourth Test ends in a draw as India take the series 2-1 👏#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/DSrUTbdMEO
— ICC (@ICC) March 13, 2023
तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियान संघाने 480 धावांचा डोंगर उभा केला होता. पहिल्या डावाड ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने 180, तर मध्यक्रमात कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने 114 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या केल्यानंतर भारतासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी शतके टोकली. विराटचे (186) द्विशतक अवघ्या 14 धावांनी हुकले, तर गिलने 128 धावांचे योगदान दिले. रविचंद्नन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे प्रदर्शन देखील कौतुकास पात्र ठरले. फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनने पहिल्या डावात 6, तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन जबरदस्त होते. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. तरत दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 9 विकेट्स राखून जिंकला. मालिकेतील चौथ्या कसोटीत मात्र कोणा एका संघाला विजय मिळवता आला नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने 5 दिवसात 40 विकेट्सचा खेळ होऊ शकला नाही.
(Indian team beat Australia 2-1 in Border Gavaskar Trophy 2023)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
भारत खेळणार WTC फायनल, अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्याआधीच अंतिम सामन्यात धडक