---Advertisement---

‘प्रशिक्षक नव्हते म्हणून जिंकलो’, १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे मोठे विधान

On: शनिवार, जून 25, 2022 9:55 PM
1983-World-Cup
---Advertisement---

कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला. ३९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून रोजी भारताने ही किमया साधली होती. पहिला विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघात क्रिस श्रीकांत देखील सहभागी होते. श्रीकांतने आता एक असे वक्तव्य केले आहे, जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले.

भारतीय संघ १९८३ मध्ये जेव्हा विश्वचषक खेळण्याच्या हेतूने इंग्लंडसाठी रवाना झाला, तेव्हा त्यांच्यासोबत संघाला प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक देखील उपलब्ध नव्हता. क्रिस श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांच्या मते त्यावेळी संघासोबत प्रशिक्षक नव्हता, हे एकप्राकारे फायद्याचेच ठरले. त्यांच्या मते प्रशिक्षक नसल्यामुळे कपिल देवच्या नेतृत्वातील भारतीय संघाला फायदाच झाला. कारण, खेळाडूंवर कसल्याही प्रकारचा दबाव नव्हता.

इतिहासातील पहिला विश्वचषक जिंकलण्याच्या ३९ वर्षांनंतर श्रीकांत चेन्नई सुपर किंग्ज डॉट कॉमशी बोलत होते. ते म्हणाले की, “एका प्रशिक्षक रणनीतीकार जास्त पाहिजे. एक चांगली बाब ही आहे की, आमच्याकडे प्रशिक्षक नव्हता. आमच्याकडे काहीच नव्हते. पीआर मान सिंग (व्यवस्थापक) यांना क्रिकेटची एबीसीडी देखील येत नव्हती आणि तरीदेखील मदत झाली. त्यामुळे एक चांगली बाब हीच होती की, कुणावरतीच कसलाही दबाव नव्हता.” अंतिम सामन्यात श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली होती.

श्रीकांतने असेही सांगितले की, तेव्हा संघात सहभागी असलेले खेळाडू सध्याच्या खेळाडूंप्रमाणे सराव किंवा व्यायाम करत नव्हते. “आम्ही व्यायाम करत नसायचो. मी, तसेच संदीप पाटीलने आयुष्यात कधीच व्यायाम केला नाही. काही लोक चार चकरा मारायचे. सय्यद किरमानी कधी कधी व्यायाम करायचे. मी माझ्या आयुष्यात (सुनील) गावसकरांना सराव करताना पाहिले नाहीये.” असे ते पुढे बोलताना म्हणाले.

श्रीकांत यांनी पुढे असेही सांगितले की, ते आजही सर्वात आळशी व्यक्ती आहे. त्यांचे वय सध्या ६२ वर्ष आहे आणि त्यांच्या पत्नीसोबत त्यांचा आजही व्यायाम करत नसल्यामुळे वाद होत असतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक

श्रीलंकेच्या फॅन्सचा नाद खुळा, ऑस्ट्रेलिया टीमला केला खास सपोर्ट

दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---