दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय संघाने १-० ची आघाडी घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (Indian team record at Centurion ground)
भारतीय संघातील खेळाडूंनी या सामन्यातील पहिल्या दिवसापासूनच दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंवर दबाव आणायला सुरुवात केली होती. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला ३०५ धावांची आवश्यकता होती. परंतु, भारतीय संघाच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव १९१ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला.
त्यामुळे, भारतीय संघ सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवणारा आशिया खंडातील एकमेव संघ ठरला आहे.
अधिक वाचा – हे माहितंय का? ‘या’ २ दिग्गजांनी भारताशिवाय इतर २ संघांकडूनही खेळलेत आंतरराष्ट्रीय सामने
दक्षिण आफ्रिकेत मिळवला चौथा विजय
सेंच्युरीयनच्या मैदानावर ११३ धावांनी मिळवलेला विजय हा भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत मिळवलेला चौथा विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१८ मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात ६३ धावांनी विजय मिळवला होता. तर २०१० मध्ये डर्बनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ८७ धावांनी विजय मिळवला होता. तसेच २००६ मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १२३ धावांनी सामना आपल्या नावावर केला होता. ( Indian team became first team to win test match at Centurion)
दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने मिळवलेले विजय
११३ धावा : सेंच्युरियन २०२१*
६३ धावा : जोहान्सबर्ग, २०१८
८७ धावा : डर्बन , २०१०
१२३ धावा : जोहान्सबर्ग, २००६
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या १९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय संघाला १३० धावांची मोठी आघाडी मिळाली होती. ही आघाडी घेत भारतीय संघाने दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ११३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
SAvsIND, 1st Test: भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेवर तब्बल ११३ धावांनी मिळवला दणदणीत विजय
ऍशेस तर गमावली, आता लाज राखण्यासाठी होणाऱ्या सिडनी कसोटीसाठी अनुपलब्ध असेल इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज
हे नक्की पाहा: आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत