न्यूझीलंड संघाला टी२० मालिकेत ३-० ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी मालिकेत दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर पासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आणि न्यूझीलंड कानपूरमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, या खेळाडूंचे हटके स्टाईलमध्ये स्वागत करण्यात आले आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
खेळाडू जेव्हा हॉटेलमध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी नेहमी त्यांचे स्वागत केले जात असते. परंतु, कानपूरच्या हॉटेलमध्ये खेळाडूंचे हटके स्टाईलमध्ये स्वागत करण्यात आले. हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्यांना खेळाडूंना भगव्या रंगाचे मडके देण्यात आले. यासह हॉटेलच्या साऊंड सिस्टीममध्ये देखील घंटा आणि राम भजनाचा आवाज घुमत होता. पहिल्यांदाच खेळाडूंचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आले आहे.
कोरोना प्रोटोकॉलमुळे कुठल्याही खेळाडूला स्पर्श करण्यास सक्त मनाई होती. १९ नोव्हेंबर रोजी अजिंक्य रहाणेसह भारतीय संघातील १० खेळाडू कानपूरला पोहोचले होते. तर उर्वरित भारतीय खेळाडू सोमवारी (२२ नोव्हेंबर) न्यूझीलंड संघासह टी२० मालिका खेळल्यानंतर कानपूरमध्ये दाखल झाले आहेत.
A warm welcome in Kanpur ahead of the first Test against India starting on Thursday. #INDvNZ pic.twitter.com/OgwYFR76vP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 22, 2021
भारत आणि न्यूझीलंड संघात २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूर येथे, तर ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईमध्ये कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.(विराट कोहलीला पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.)
महत्त्वाच्या बातम्या –
टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार