---Advertisement---

आयसोलेशनमधील भारतीय खेळाडूंबाबत महत्त्वाची अपडेट, कोरोना टेस्टचा अहवाल आला पुढे

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 12:12 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर ३ आठवड्यांच्या सुट्टीवर गेलेल्या भारतीय कसोटी संघावर कोरोनाने वार केला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासह आणखी काही सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र आता इंग्लंडहून भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह पंत आणि गरानी यांच्या संपर्कात आलेल्या साहा, ईश्वरन आणि प्रशिक्षक अरुण यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबरोबरच भारतीय संघातील इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यही निगेटिव्ह आढळले आहेत. याखेरीज पंतची प्रकृतीही चांगली असल्याचे समजत आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने ईनसाइड स्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय संघातील सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने सर्वांचा निकाल सकारात्मक आला आहे. तरीही नियमांनुसार साहा, ईश्वरन आणि अरुण यांना इतर खेळाडूंसह डरहॅमला जाण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांना लंडनमधील संघाच्या हॉटेलमध्ये विलगीकरणात राहण्यास सांगितले गेले आहे.’

रिषभ पंत बाबतीतही आनंदाची बातमी
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला युवा यष्टीरक्षक पंत वेगाने बरा होत आहे. तरीही त्याला येत्या रविवारपर्यंत (१८ जुलै) एकांतवासात राहावे लागणार आहे. आतापर्यंत त्याची २ वेळा कोरोना चाचणी केली गेली आहे. आनंदाची बाब म्हणजे, दोन्ही वेळा त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे समजत आहे.

विराटसेना सराव सामन्याच्या लागली तयारीला
सध्या विलगीकरणात असलेल्या खेळाडूंना वगळता इतर भारतीय खेळाडू सराव सामन्यासाठी डरहॅमला रवाना झाले आहेत. तिथे त्यांना डरहॅमच्या रिवरसाइड मैदानावर २० ते २२ जुलै दरम्यान कांउटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी काउंटीचा संघही जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना पॉझिटिव्ह रिषभवर टीकेची झोड, बीसीसीआय अध्यक्षाचा बचावासाठी पुढाकार; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सराव सामन्यात राहुल घेणार पंतची जागा, पहिल्या कसोटीतूनही अव्वल यष्टीरक्षकाला करू शकतो आऊट

खराब फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---