---Advertisement---

VIDEO | राहुल-अथियाच्या लग्नात विराट-जड्डूचा कहर डान्स, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

KL Rahul Wedding
---Advertisement---

केएल राहुल आणि अथिया शेट्टी मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल आणि बॉलिवुड अभिनेत्री अथिया लग्नबंधनात अडकणार असल्याचे मागच्या काही दिवसांपासून सांगितले जात होते. सोमवारी (23 जानेवारी) अखेर या दोघांचे लग्न पार पाडले. लग्नानंतर केएल राहुल आणि अथियाचे फोटो अद्याप समोर आले नाहीत, पण भारतीय संघातील राहुलच्या सहकारी खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) याची मुलकी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांना डेट करत होते. मागच्या काही महिन्यांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. सोमवारी सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर राहुने अथियाशी लग्न केले आणि आयुष्यातील नव्या डावाची सुरुवात केली. राहुल आणि अथियाचे (KL Rahul Athiya Shetty Wedding) लग्नातील फोटो अजून समोर आले नाहीत, पण सुनील शेट्टीने फार्म हाऊसच्या बाहेर येऊन पत्रकारांचे तोंड गोड केले आणि तो सासरा झाल्याचेही सांगितले.

https://www.instagram.com/reel/CnwgcApDUqh/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, त्यामुळे लग्नाला बहुतांश क्रिकेटपटू उपस्थित राहू शकले नाही, असे सांगितले जात आहे. पण सोशल मीडियावर मात्र भारतीय क्रिकेटपटूंचे पोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हे फोटो लग्नातील नसले तरी, नेटकऱ्यांनी त्याचा अगदी सोयीस्कर उपयोग करत याचे भांडवल केले आहे. राहुल आणि अथियाच्या लग्नानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मजेदार मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Sport_BetPro/status/1617398965460426754?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/sri_ashutosh08/status/1617501362341957632?s=20&t=S_xCn1a9370Xt-nUgqizFQ

https://twitter.com/Drink_Cricket/status/1617521599242207233?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/Alishap789/status/1617481933432434690?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/sagarcasm/status/1617489593460469763?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/KaustubhP26/status/1617518509189378048?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/crickdevil/status/1617469788770668544?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/crickdevil/status/1617471343704039424?s=20&t=RdoRuPjAAHg21iZFjr5ayA

https://twitter.com/kadak_chai2/status/1617485302066712576?s=20&t=g6FvO2DCeh319vZvN3rJHg

दरम्यान, राहुलने लग्नाचे कारण देत बीसीसीआयकडून सुट्टी मागितली होती. याच कारणास्तव बीसीसीआयने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत सामील केले नाही. पण तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी अपक्षित असेल, असे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. (Indian team memes are going viral on social media after KL Rahul and Athiya Shetty’s wedding)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गडी काय थांबना! बिग बॅशमध्ये स्मिथचा धुमाकूळ सुरूच; सलग तिसऱ्या सामन्यात कुटल्या तुफानी धावा
टेन्शन नको, विराट तिसरा वनडे गाजवणारच! भारतीय दिग्गजाने व्यक्त केला ठाम विश्वास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---