नवी दिल्ली। तसे पाहता भारतीय हॉकी टीम एशिया कपच्या (Asia Cup 2022) फायनलमधून आता बाहेर फेकली गेली आहे. मात्र टीमच्या कामगिरीने सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. यंदा एशिया कपसाठी भारताने संघात जूनियर खेळाडूंचा समावेश केला होता. तरीही भारताने पहिल्या सुपर 4 मध्ये स्थान मिळवले आणि शेवटच्या सामन्यापर्यंत जोर लावला. भारतीय टीम आता जपानसह तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानावर उतरेल.
यासंदर्भाने भारतीय हॉकीचे माजी कर्णधार आणि प्रख्यात खेळाडू दिलीप टिर्की हेसुद्धा भारतीय टीमचे कौतुक करताना दिसले. दिलीप टिर्की (Dilip Tirkey) यांच्या मते, एशिया कपमध्ये खेळणारी टीम अगदीच तरुण आहे. सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळ करत अतिशय उत्कृष्ट खेळ केला. मात्र संघाला अजून थोडा अनुभव मिळण्याची गरज आहे.
आगामी विश्वचषक आणि कॉमनवेल्थ गेम्सबाबत दिलीप यांचे म्हणणे आहे, की संघाने फ्लिकरवर जोर दिला पाहिजे. संदीप सिंह आणि योगराज यांच्या जाण्यानंतर आपल्या संघाला फ्लिकर्सची कमतरता जाणवते आहे. यावेळी धुपेंद्र पालने चांगला खेळ केला. आपली डिफेन्सची बाजूही आता मजबूत आहे. आपल्याला आता पुन्हा एकदा 40 वर्ष जुना संघ बघायला मिळतो आहे. अशावेळी संघाचा मेंटल आणि फिजिकल फिटनेस कायम राहिला पाहिजे.
एशिया कप आणि भारतीय हॉकीबाबत विश्लेषण करण्यासाठी देशाचा पहिले बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच, ‘कू’ (Koo App) ने ‘हॉकी महामंचा’चे आयोजन केले होते. यात माजी भारतीय खेळाडू दिलीप टिर्की यांनी आपली परखड मतं मांडली. सोबत जेष्ठ क्रीडा पत्रकार अभिषेक सेनगुप्ताही होते.
भारतीय कोचिंगबाबतही टिर्की बोलले. त्यांनी संघाला यशस्वी करत नव्या तऱ्हेनं उभे राहण्यास शिकवल्याबद्दल डेविड जॉन यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “2011-12 नंतर अनेक प्रशिक्षक आले, मात्र डेविड जॉन यांनी संघाला एका वेगळ्याच उंचीवर पोचवले. आता संघाचे कोच सरदार सिंह आहेत. त्यांचीही पद्धत मला भावली आहे. ते अजून संशोधन करत अनोखे प्रयोग करतील याची मला खात्री आहे.”
भविष्यातील मोठ्या सामन्यांसंदर्भात दिलीप यांनी गोलकीपर श्रीजेशच्या फिटनेसबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी श्रीजेशला मोठमोठ्या सामन्यांमध्ये खेळताना पाहू इच्छितो. त्याच्यासारखा गोलकीपर संघाला नक्कीच गरजेचा आहे.”
भारतीय हॉकीमध्ये सध्या होत असलेल्या विधायक बदलांबाबत टिर्की यांनी ओडिसा शासनाचे आभार मानले आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे कौतुकही केले. टिर्की म्हणाले, की ओडिसा शासनाने भारतीय हॉकीला पूर्णत: बदलून टाकले आहे. आज हॉकीमधल्या सुविधांवर विशेष लक्ष दिले जाते. सोबतच सामन्यांची संख्याही वाढली आहे. यातून खेळाडूंचे मनोबल वाढते आहे.”
समारोप करताना टिर्की म्हणाले, “विशेषत: ओडिसामधल्या लोकांमध्ये हॉकीसंदर्भाने उत्साह खूपच वाढला आहे. आज ज्या पद्धतीने लोक ओडिसामध्ये सामना बघायला मैदानात येतात तसा जोश जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात पहायला मिळत नाही. आज आम्हालाही गर्व होतो आहे, की आम्ही हॉकीचे खेळाडू आहोत. भुवनेश्वर आणि कलिंगाच्या मैदानावर आज जगभरातले खेळाडू येऊन आपला खेळ दाखवू इच्छितात. योबतच ओडिसात जगातले सर्वात चांगले स्टेडियम बनणार आहे. यातून केवळ भारत नाही तर जगभरातल्या हॉकीत परिवर्तन घडले आहे.”
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारीच ना! आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने काढला जपानचा वचपा, २-१ने घेतला मागच्या पराभवाचा बदला
अरेरे! अखेरच्या क्षणी भारताने पाकिस्तानविरुद्ध गमावली विजयाची संधी, आशिया कप सामन्यात बरोबरी
भारतीय हाॅकी क्षेत्राचे मोठे नुकसान, ‘या’ माजी कर्णधाराचे निधन