---Advertisement---

गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 8:50 AM
Team-India
---Advertisement---

लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला.या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवून मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

परंतु भारतीय संघासाठी हा विजय मिळवणे सोपे नसणार आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबर पासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. लीड्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. परिणामी भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही मालिका जिंकायची असेल तर पुढील दोन्ही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवावा लागणार आहे. चला तर पाहूया कशी राहिलो आहे ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी?

अशी राहिली आहे ओवलच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी
ओवलच्या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. या १३ सामन्यांपैकी भारतीय संघाला एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ७ सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि ५ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाने ५० वर्षांपूर्वी १९७१ साली या मैदानावर एकमेव विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाला एकही विजय मिळवता आला नाहीये. २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ओवलच्या मैदानावर ११८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, भारतीय संघाला या मैदानावर विजय मिळवणे थोडे कठीण जाऊ शकते.(Indian team record at oval against England)

मध्यक्रमातील फलंदाज ठरताय फ्लॉप
भारतीय संघाच्या पराभवाचे मुख्य कारण, भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज आहेत. ओव्हलच्या मैदानावर देखील इंग्लंड संघ भारतीय संघाच्या या कमकुवत पक्षावर जोरदार आक्रमण करू शकतात. हेडिंग्ले कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. तर दुसऱ्या डावात रोहित शर्मा, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी झुंज दिली. परंतु, त्यांना मध्यक्रमातील फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

तरी, भारतीय संघासाठी आनंदाची बाब अशी की, गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप ठरत असेलेले फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी अर्धशतक झळकावले. भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

ना ना…! कोहली आणि संघाला कमी लेखण्याची चूक करू नका; शास्त्रींची इंग्लंडला चेतावणी

अश्विनच्या सहभागाच्या अंदाजानेच इंग्लंडचा उडालाय थरकाप, ओव्हलच्या खेळपट्टीशी करणार छेडछाड!

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शास्त्री काय करणार? ऐका त्यांच्याच तोंडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---