आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२० स्पर्धेतील अंतिम सामना सर्वांना अजूनही लक्षात असेल. या सामन्यात भारतीय १९ वर्षाखालील (icc under 19 world cup) संघाला अंतिम सामन्यात बांगलादेश १९ वर्षाखालील संघाने पराभूत करत जेतेपद पटकावले होते. आता भारतीय संघाला या पराभवाची व्याजासह परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे. हे दोन्ही संघ आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आमने सामने येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.(india vs Bangladesh)
भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीत विजय जवळजवळ निश्चित आहे. हे भारतीय संघाची साखळी सामन्यातील कामगिरी पाहता तुम्हाला लक्षात येईल. भारतीय संघाने आतापर्यंत साखळी फेरीतील एकही सामना गमावला नाहीये. बांगलादेश संघाला पराभूत करून भारतीय संघ आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो.
अशी राहिली आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी
१) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका , पहिला सामना
या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ४५ धावांनी पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या १८७ धावांवर आटोपला होता.
२) भारत विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना
साखळी फेरीत भारतीय संघाची दुसरी लढत आयर्लंड संघाविरुद्ध पार पडली होती. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. ज्यामध्ये कर्णधार यश धूलचा देखील समावेश होता. असे असतानाही भारताच्या खेळाडूंनी १७४ धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. भारताच्या ३०७ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १३३ धावा करू शकला.
३) भारत विरुद्ध युगांडा ,तिसरा सामना
साखळी फेरीतील तिसरा सामना भारतीय संघासाठी आणखी सोपा होता. या सामन्यात भारतीय संघाचा सामना युगांडा संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३२६ धावांच्या फरकाने विजय आपल्या नावावर केला होता. युगांडाच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना भारतीय संघातील फलंदाजांनी ४०५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात युगांडाचा संपूर्ण डाव अवघ्या ७९ धावांवर संपुष्टात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
‘या’ कारणामुळे मायदेशात वनडे, टी२० मालिका खेळण्यापासून मुकला अश्विन, विडिंजविरुद्ध बसाव लागलं बाहेर
सुपर लीगच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची धडक, बघा भारत आणि पाकिस्तान कधी खेळणार क्वार्टर फायनल?
हे नक्की पाहा: