भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) दौरा आता समाप्त झाला आहे. या संपूर्ण दौऱ्यावर भारतीय संघातील खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे. या दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर नुकत्याच संपन्न झालेल्या वनडे मालिकेत देखील ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारतीय संघाला आणखी दोन मोठ्या मालिका खेळायच्या आहेत.(India tour of South Africa)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केलेल्या निराशाजनक कामगिरीला विसरून भारतीय संघ आता नवीन सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच भारतीय संघाने परदेशात मालिका गमावली आहे. आता भारतीय संघाचा सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणार आहे.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
भारत-वेस्ट इंडिज मालिका (India vs West Indies)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील तीनही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहेत. त्यानंतर तीन टी२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे सामने कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. वनडे सामने ६ फेब्रुवारी, ९ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी रोजी खेळवले जातील. तर १६, १८ आणि २० फेब्रुवारीला टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे.
भारत-श्रीलंका मालिका (India vs Srilanka)
भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरुवातीला २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ही मालिका झाल्यानंतर ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ फेब्रुवारीपासून बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. तर दुसरा कसोटी सामना ५ मार्चपासून मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे.
पहिला टी२० सामना १३ मार्च रोजी मोहालीमध्ये रंगणार आहे. त्यानंतर १५ मार्च रोजी धर्मशाला येथे दुसरा टी२० सामना खेळवला जाईल. तसेच शेवटचा सामना १८ मार्च रोजी लखनऊच्या मैदानावर पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
निराशाजनक द. आफ्रिका दौऱ्यात भारतासाठी ‘या’ ५ राहिल्या जमेच्या बाजू, ज्या भविष्यात येणार कामी
रिषभ पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराटची जहरी रिॲक्शन पाहिली का? व्हिडिओ आहे चर्चेत
हे नक्की पाहा: