भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. कोरोना विषाणूमुळे भारतीय संघाला जैव सुरक्षित बबलमध्ये रहावे लागेल. यावर नवी बातमी अशी आहे की संघातील खेळाडू छोट्या छोट्या बबलमध्ये राहतील. म्हणजेच, भारतीय संघातील सर्व खेळाडू सराव छोट्या बबलमध्ये करतील. विराट कोहली कर्णधार असलेला भारतीय संघ नोव्हेंबरच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये जाईल.
पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारने असे नमूद केले आहे की क्वारंटाईन नियमांनुसार ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या सदस्यांना कोणताही विशेष दिलासा दिला जाणार नाही. अॅडलेडला गेल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना नियमित काम करण्याची परवानगी दिली जाईल परंतु त्यांना 3 ते 4 गटात विभागले जाईल.
भारतीय संघात असतील अधिक खेळाडू
माध्यमांतील वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघात नियमित खेळाडूंव्यतिरिक्त काही राखीव खेळाडू असू शकतात. त्यांची संख्या 23 ते 25 पर्यंत असू शकते.
अॅडलेडमध्ये नवीन आलिशान हॉटेलचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ते 25 सप्टेंबर रोजी उघडणे अपेक्षित आहे. यात भारतीय संघाला ठेवण्याची योजना आहे. अॅडीलेड ओव्हलच्या जवळच हॉटेल असल्याने, खेळाडूंना सराव करण्यास जाण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
भारतीय संघाच्या दौऱ्यादरम्यान गुलाबी चेंडूचा सराव सामना असू शकतो. परदेशी भूमीवर प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यापूर्वी सराव सामन्याची शक्यता आहे.
तथापि, अद्याप याची अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. हे तेव्हाच कळेल जेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलिया अधिकृतपणे संघाच्या वेळापत्रकाची घोषणा करेल.
भारतीय संघातील बर्याच खेळाडूंचा या दौऱ्यापूर्वी आयपीएलमध्ये खेळताना खूप सराव होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
हा २३ वर्षाचा फिरकीपटू एमएस धोनीलाही ठोकु देत नाही षटकार
दिग्गजांशी तुलना होत असलेला हा खेळाडू प्रेमाच्या खेळपट्टीवरही ठोकतोय चौकार आणि षटकार?
हिटमॅन रोहित शर्मा चेंडू फक्त स्टेडियमबाहेरच पाठवत नाही, तर चालत्या बसवर मारतोय, पहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित
असे ४ क्रिकेटर जे परदेशात जन्मले पण खेळले भारतासाठी क्रिकेट
…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला