क्रिकेट या खेळात रोज नवीन विक्रम निर्माण केले जातात. त्याचबरोबर रचले गेलेले जुने विक्रम रोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूकडून मोडीत काढले जातात. यामध्ये असे काही खेळाडू आहे ज्यांनी रचलेले विक्रम आज ही अबाधित आहेत. त्यामुळे अशा सर्व विक्रमाची नोंद इतिहासात नोंद केलेली पाहिला मिळते. यामध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांनी भारतासाठी खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे.
मात्र आज आपण लेखामधून फक्त कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेवर प्रकाशझोत टाकणारा आहोत. यामध्ये आपण भारतीय खेळाडूंनी चॅम्पियनशिप स्पर्धेत फलंदाजी करताना धावांचे डोंगर उभारलेत आहेत. त्यापैकी आपण भारताकडून कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक जास्त धावा काढलेल्या तीन भारतीय खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत.
1. अजिंक्य रहाणे
कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक जास्त धावा काढणार्या यादीत पहिल्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेचे नाव आहे. जो सध्या भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करत आहे. आतापर्यंत अजिंक्य रहाणेने 11 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने 18 डावात फलंदाजी करताना 896 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची 115 ही धावसंख्या आहे. या सामन्यांत त्याने 59.73 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 47.86 राहिला आहे .
अजिंक्य रहाणे 896 धावा करण्यासाठी 1872 चेंडूंचा सामना केला आहे. या सामन्यांत एकूण 3 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 104 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत.
2. मयंक अगरवाल
या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या यादीत मयंक अगरवाल दुसर्या स्थानी आहे. मयंक अगरवालने 11 सामन्यांतील 18 डावात फलंदाजी केली आहे. यामधे त्याने 810 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 243 राहिली आहे. या स्पर्धेत त्याने 45 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ज्यामधे त्याचा स्ट्राईक रेट 55.25 चा होता.
मयंक अगरवालने यादरम्यान 1466 चेंडूचा सामना केला आहे. ज्यामध्ये त्याच्या बॅट मधून 3 शतके आणि 2 अर्धशतके निघाली आहेत. त्याने 18 डावात फलंदाजी करताना 100 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत. सध्या तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. त्याला पहिल्या दोन सामन्यात चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे त्याचा तिसर्या कसोटी सामन्यासाठी विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे.
3. विराट कोहली
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत विराट कोहलीने 706 धावा काढल्या आहेत. त्याने या स्पर्धेतील 10 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने 16 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. तसेच त्याने 50.35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने आत्तापर्यंत या स्पर्धेत 16 डावात फलंदाजी करताना त्याचा स्ट्राईक रेट 59.19 राहिला आहे. त्याचबरोबर त्याने 1191 चेंडूचा सामना केला आहे. या 10 सामन्यात विराट कोहलीने 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. या सामन्यांत त्याच्या बॅट मधून 89 चौकार आणि 3 षटकार निघाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– व्हिडिओ : जेमिसनने चाहत्याच्या टक्कलवर दिला ऑटोग्राफ, मग काय चाहत्याने पूर्ण लूकच बदलला
– नादच खुळा! पाकिस्तानविरुद्ध विलियम्सनचं कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक, १४ दिग्गजांना टाकले मागे
– अजबच! झेल घ्यायचा सोडून या खेळाडूने केले डोळे बंद, पाहा व्हिडिओ