काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup) थरार पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत केले होते. यासह पाचव्यांदा आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आता मायदेशात परतले आहे.
यश धूलच्या (yash dhull) नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारतीय संघ वेस्ट इंडिजवरून एम्सटर्डम आणि दुबईमार्गे बेंगलोरला गेला होता. त्यानंतर मंगळवारी (८ फेब्रुवारी ) संघातील खेळाडू अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी (९ फेब्रुवारी) अहमदाबादमध्ये बीसीसीआयने (Bcci) या खेळाडूंसाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) देखील भारतीय १९ वर्षाखालील संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये होते.
भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आपला दरारा कायम ठेवला आहे. शनिवारी (५ फेब्रुवारी) या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत पाचव्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले. असा कारनामा करणारा भारतीय संघ एकमेव संघ ठरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २०००,२००८,२०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १९८८, २००२ आणि २०१० मध्ये या स्पर्धेत विजय मिळवला होता.
या ५ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवला आहे विजय
भारतीय १९ वर्षाखालील संघाने जेव्हा पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते, त्यावेळी संघाचे कर्णधारपद मोहम्मद कैफ कडे होते. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरले होते. तसेच २०१२ मध्ये उन्मुक्त चंद आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच नुकताच संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व यश धुलने केले होते.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी
मोठी बातमी! आयपीएलमधील अहमदाबाद संघाचे नाव अखेर फायनल, पाहा काय झालंय नामकरण
INDvsWI: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने जिंकला टॉस; केएल राहुलचे पुनरागमन, तर पोलार्ड बाहेर