---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 2, 2022 7:52 PM
Indian Womens cricket Team
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राजेश्वरी गायकवाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राजेश्वरीवर सुपर मार्केटच्या एका कर्मचाऱ्यासोबत मारामारी करण्याचा आरोप लावण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय.

राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) भारतीय संघात फिरकीपटूच्या भुमिकेत खेळते. राजेश्वरी एका सुपर मार्केटमध्ये गेली असता तिचे मार्केटमधील कर्मचाऱ्यासोबत एका वस्तुच्या किमतीवरुन शाब्दिक वाद झाले आणि नंतर त्या शाब्दिक वादाचे रुपांतर मारामारीत झाले. सुपर मार्केटच्या मालकासोबतही तिचे जोरदार भांडण झाले. काही वेळानंतर तिच्या काही मित्रांनी स्टोरमध्ये घुसून मालकाला मारहाण केली.

दरम्यान, सुपर मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. यामध्ये दिसत आहे की, राजेश्वरी काही कॉस्मॅटीक्स खरेदी करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये आली होती. तिचे काही मित्र देखील तिच्यासोबत होते. या दरम्यान, तिला काही वस्तुंची किंमत जास्त वाटू लागली. यावरुन तिने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायली सुरुवात केली. शाब्दिक इतक्या प्रमाणात वाढले की प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले. इतक्यात तिचे मित्र तिकडे आले आणि त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि न्यूज चॅनल्सवरही दाखवण्यात आला.

Karnataka:Indian cricketer Rajeshwari Gaikwad involved in altercation, her friends thrash shopkeeper

घडलेल्या प्रकाराबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. अहवालानुसार, आधी सुपर मार्केटचा मालक तक्रार करु इच्छित होता. मात्र, दोन्ही बाजूंकडून वाद मिटवण्यात आला आणि परस्पर सहमतीने त्यांनी तक्रार केली नाही.

राजेश्वरी गायकवाड ही भारतीय महिला संघाची फिरकीपटू आहे. तिने 19 जानेवारी 2014ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2017मध्ये महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघाचा राजेश्वरी भाग होती. तिने या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात 15 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय विश्वचषकात कोणत्याही भारतीय गोलंदाजाचे हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते.(Indian Woman Cricketer allegedly beaten shop owner over arguments on price)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राशिदकडे ‘एमआय’ फॅमिलीतील कर्णधारपद! पोलार्डच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी
मोठी बातमी: चालू सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पॉंटिंगला हृदयाचा त्रास; तातडीने हॉस्पिटलमध्ये केले भरती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---